मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

युक्रेनियन व्यक्ती VIDEO काढत असतानाच रशियन टँकने केला गोळीबार, कॅमेऱ्यात कैद झालं थरारक दृश्य

युक्रेनियन व्यक्ती VIDEO काढत असतानाच रशियन टँकने केला गोळीबार, कॅमेऱ्यात कैद झालं थरारक दृश्य

या व्हिडिओमध्ये दिसतं, की व्यक्ती आपल्या कॅमेऱ्यात युक्रेनमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. मात्र, तो घराबाहेर येऊन रेकॉर्डिंग करत असतानाच रशियन टँकने गोळीबार सुरू केला

  • Published by:  Kiran Pharate

कीव 02 मार्च : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठवड्यापासून युद्ध (Russia Ukraine War) चालू आहे. रशियाने युक्रेनमधल्या अनेक महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य केलं आहे. एकीकडे चर्चा, वाटाघाटी सुरू असताना दुसरीकडे रशिया अधिक आक्रमक होताना दिसत आहे. रशियाचा मुकाबला करण्यासाठी आता सैन्यासोबत युक्रेनियन नागरिकांनीही शस्त्रं हाती घेतली आहेत. युक्रेनमध्ये रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांचे व्हिडिओही समोर येत आहेत. असाच आणखी एक थरकाप उडवणारा व्हिडिओ (Russian Tank Shelling Video).

बुखारेस्ट विमानतळावर ज्योतिरादित्य सिंधियांनी साधला मराठीत संवाद, VIDEO

या व्हिडिओमध्ये (Shocking Viral Video from Ukraine) दिसतं, की व्यक्ती आपल्या कॅमेऱ्यात युक्रेनमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. मात्र, तो घराबाहेर येऊन रेकॉर्डिंग करत असतानाच रशियन टँकने गोळीबार सुरू केला. टँकने केलेला हा हल्ला इतका भीषण होता की त्याचा परिणाम व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचला. या हल्ल्यात व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीच्या शेजारी असलेल्या घराच्या काचाही फुटल्या. हा व्हिडिओ खेरसनमधील आहे. रशियन सैन्याने दक्षिण युक्रेनमधील खेरसन या शहरावर ताबा मिळवला असल्याचं वृत्तही समोर येत आहे.

या हल्ल्यात कॅमेरा हातात घेऊन असलेला हा व्यक्ती अगदी थोडक्यात बचावला. त्याने स्वतःचा मृत्यूच्या दारातून परत आल्याचा व्हिडिओ स्वतःच रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे. हे दृश्य अतिशय भयानक आणि काळजाचा ठोका चुकवणारं आहे.

कीवमधून बाहेर पडलेत सगळे भारतीय; भारतात परत आणण्यासाठी आहे असं नियोजन

रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच आहेत. रशियन हवाई सैन्याने आता पूर्व युक्रेनियन खार्किव्ह शहरात उतरून स्थानिक रुग्णालयावर हल्ला केला. युक्रेनियन सैन्याने याबद्दलची माहिती दिली आहे.

First published:

Tags: Russia Ukraine, Shocking video viral