मराठी बातम्या /बातम्या /विदेश /कीवमधून बाहेर पडलेत सगळे भारतीय; भारतात आणण्यासाठी आहे असं नियोजन, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

कीवमधून बाहेर पडलेत सगळे भारतीय; भारतात आणण्यासाठी आहे असं नियोजन, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

परराष्ट्र सचिव म्हणाले की, “जेव्हा आम्ही आपली पहिली अॅडवायजरी जारी केली तेव्हा युक्रेनमध्ये सुमारे 20,000 भारतीय विद्यार्थी होते. तेव्हापासून सुमारे 12,000 विद्यार्थ्यांनी युक्रेन सोडलं आहे"

परराष्ट्र सचिव म्हणाले की, “जेव्हा आम्ही आपली पहिली अॅडवायजरी जारी केली तेव्हा युक्रेनमध्ये सुमारे 20,000 भारतीय विद्यार्थी होते. तेव्हापासून सुमारे 12,000 विद्यार्थ्यांनी युक्रेन सोडलं आहे"

परराष्ट्र सचिव म्हणाले की, “जेव्हा आम्ही आपली पहिली अॅडवायजरी जारी केली तेव्हा युक्रेनमध्ये सुमारे 20,000 भारतीय विद्यार्थी होते. तेव्हापासून सुमारे 12,000 विद्यार्थ्यांनी युक्रेन सोडलं आहे"

कीव 02 मार्च : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान (Russia Ukraine War) युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना (Indians in Ukraine) बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. परराष्ट्र मंत्रालयानं माहिती दिली आहे, की भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी पुढील 3 दिवसांत 26 फ्लाइट शेड्यूल आहेत. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले की, बुखारेस्ट आणि बुडापेस्ट व्यतिरिक्त, पोलंड आणि स्लोव्हाक रिपब्लिकमधील विमानतळांचा वापर निर्वासन उड्डाणे चालवण्यासाठी केला जाईल.

परराष्ट्र सचिव म्हणाले की, “जेव्हा आम्ही आपली पहिली अॅडवायजरी जारी केली तेव्हा युक्रेनमध्ये सुमारे 20,000 भारतीय विद्यार्थी होते. तेव्हापासून सुमारे 12,000 विद्यार्थ्यांनी युक्रेन सोडलं आहे. उर्वरित 40% विद्यार्थ्यांपैकी, सुमारे अर्धे विद्यार्थी संघर्ष झोनमध्ये आहेत तर अर्धे युक्रेनच्या पश्चिम सीमेवर पोहोचले आहेत किंवा तिथे पोहोचण्याच्या मार्गावर आहेत.

नवीन मृत्यूच्या आधी फोनवर नेमकं काय म्हणाला? मित्राने टाहो फोडत सांगितला थरार

हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले, "आपल्या सर्व नागरिकांनी कीव सोडलं आहे. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार, कीवमध्ये आता भारतीय नागरिक राहिलेले नाहीत. तिथून कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही."

श्रृंगला म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भारतीय नागरिकाच्या (मंगळवारी सकाळी खार्किवमध्ये झालेल्या गोळीबारात मारला गेलेला भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा) मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की आम्ही आमच्या नागरिकांना लवकरात लवकर याठिकाणाहून बाहेर काढू आणि नवीन शेखरप्पा यांचं पार्थिव परत आणू. आम्ही याबाबत स्थानिक प्राधिकरणाच्या संपर्कात आहोत.

Google Maps देखील रशिया-युक्रेन युद्धात सहभागी, अशाप्रकारे करत आहे मदत

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील सूत्रांनीही माहिती दिली की आज भारतातून युक्रेनला मानवतावादी मदत पाठवण्यात आली. सूत्रांनी सांगितलं की तंबू, ब्लँकेट्स, सर्जिकल हातमोजे, संरक्षणात्मक आय गिअर, पाण्याची साठवण करण्याच्या टाक्या, स्लीपिंग मॅट्स, ताडपत्री आणि औषधे यासह दोन टन मदत आज युक्रेनला पाठवण्यात आली.

परराष्ट्र सचिवांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदींना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा फोन आला होता. पंतप्रधान मोदींनी पोलंडच्या राष्ट्रपतींशी चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं.

First published:

Tags: Russia Ukraine, War