अंकारा, 05 मे : युक्रेनच्या एका खासदाराने रशियाच्या प्रतिनिधीला मारहाण केल्याचं समोर आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंकारात ब्लॅक सी इकॉनॉमिक कोऑपरेशनच्या बैठकीवेळी हा प्रकार घडला. बैठकीवेळी उपस्थित प्रतिनिधींचे फोटोशूट सुरू होता. त्यावेळी युक्रेनचे खासदार अलेक्झांडर मारिकोवस्की हे युक्रेनचा झेंडा घेऊन उभा होते. तेव्हा रशियाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या हातातला झेंडू ओढून घेत फेकून दिला आणि पुढे निघाले. युक्रेनच्या खासदारांना या प्रकारामुळे प्रचंड राग आला. तेव्हा रशियन प्रतिनिधीचा पाठलाग करत युक्रेनच्या खासदाराने दणका दिला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाचीही झाली. मारिकोवस्की यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी म्हटलं की, रशियन प्रतिनिधी हा पंच डिझर्व्ह करतात. परदेशातील लाखोंची नोकरी सोडली, अन् 3 लाखांत व्यवसाय सुरू केला, आता करते कोटींची उलाढाल द किव पोस्टच्या एका पत्रकारानेही हा व्हिडीओ शेअर केला आहे. 24 तासात लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. बैठकीत ब्लॅक सी क्षेत्रातील देशांचे प्रतिनिधी आर्थिक, तांत्रिक आणि सामाजिक मुद्द्यांवर चर्चा करत होते. ब्लॅक सी इकॉनॉमिक कोऑपरेशनची स्थापना 30 वर्षांपूर्वी 1992 मध्ये झाली होती.
🥊 In Ankara 🇹🇷, during the events of the Parliamentary Assembly of the Black Sea Economic Community, the representative of Russia 🇷🇺 tore the flag of Ukraine 🇺🇦 from the hands of a 🇺🇦 Member of Parliament.
— Jason Jay Smart (@officejjsmart) May 4, 2023
The 🇺🇦 MP then punched the Russian in the face. pic.twitter.com/zUM8oK4IyN
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या घरावर 3 मे रोजी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. याचा आरोप युक्रेनवर करण्यात आला. मात्र युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. क्रेमलिनवर आम्ही हल्ला केला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. हल्ल्यानंतर पुतीन यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले होते की, ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा पुतीन क्रेमलिनमध्ये उपस्थित नव्हते. हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता. सध्या पुतीन मॉस्कोत त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आहेत आणि तिथूनच काम करतायत.