जाहिरात
मराठी बातम्या / देश / परदेशातील लाखोंची नोकरी सोडली, अन् 3 लाखांत व्यवसाय सुरू केला, आता करते कोटींची उलाढाल

परदेशातील लाखोंची नोकरी सोडली, अन् 3 लाखांत व्यवसाय सुरू केला, आता करते कोटींची उलाढाल

परदेशातील लाखोंची नोकरी सोडली, अन् 3 लाखांत व्यवसाय सुरू केला, आता करते कोटींची उलाढाल

सिंगापूरमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीतीतल डिजिटल मार्केटिंगची भल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून परतलेल्या मुलीने क्रांती घडवली आहे.

  • -MIN READ Local18 Rajasthan
  • Last Updated :

शक्ती सिंग (राजस्थान), 05 मे : सिंगापूरमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीतीतल डिजिटल मार्केटिंगची भल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून परतलेल्या मुलीने क्रांती घडवली आहे. लाखोंचे पॅकेज सोडून ती भारतात परतली यानंतर तीने आपल्या गावातील एका छोट्या टीमसोबत डिजिटल गो व्हेअर प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. यातून भार्गवी राठी नावाच्या मुलीने देशातच नाही तर परदेशातही आपली सेवा देत एक व्यवसाय करू पाहणाऱ्या लोकांना आदर्श घालून दिला आहे.

जाहिरात

दरम्यान भार्गवी राठी म्हणाली की, यापूर्वी मी सिंगापूरमध्ये डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करत होते. मग विचार केला की आपल्याच देशात जाऊन हे काम का करू नये असा विचार आला अन् स्थानिकांना याची माहिती दिली पाहिजे आणि रोजगारही दिला पाहिजे असा मनात विचार आला. यानंतर फक्त तीन लाख रुपयांत  व्यवसाय सुरू केला.  

आयुष्यभर झाडू मारला त्याच शाळेला दिली लाखो रुपयांची देणगी, कोण आहे ही रणरागिणी?

या स्टार्टअपने देशातच नव्हे तर परदेशातही आपले पाय रोवले आहेत. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, गो-टू-मार्केट, वेबसाइट आणि अॅप डेव्हलपमेंट, परफॉर्मन्स मार्केटिंग, ऑरगॅनिक मार्केटिंग, ब्रँड बिल्डिंग, ऑटोमेशन, इन्फ्लुएंसर आणि सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये सेवा प्रदान करणे हे त्याच्या कंपनीचे कार्य आहे.

भार्गवीने सांगितले की त्यांचे क्लायंट यूके, सिंगापूर, कॅनडा, यूएस मध्ये देखील आहेत. कोटा येथील 7 ते 8 लोकांची टीम सोशल मीडिया ऑनलाइन डिजिटल मार्केटिंगचे काम करते. तर परदेशातील 25 जणांची टीम डिजिटल मार्केटिंगचे संपूर्ण काम पाहते.

जाहिरात

‘आम्ही B2B आणि ई-कॉमर्स व्यवसायांना त्यांचे स्थानिक आणि जागतिक अस्तित्व निर्माण करण्यासाठी मदत करत आहोत. 3 लाखांच्या छोट्या सुरुवातीसह, आम्ही जगभरातील 25 पेक्षा जास्त क्लायंटना 10 कोटींहून अधिक महसूल व्युत्पन्न करण्यात मदत केली आहे आणि आमच्या स्वत:च्या कंपनीसाठी 1 कोटींहून अधिक महसूलही निर्माण केला आहे.

Nashik News : ‘दोस्तो की दुनियादारी’ तब्बल 36 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले शाळेतले मित्र
जाहिरात

भार्गवीची कंपनी डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली ओळख निर्माण करतो. स्थानिक उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारात विकता येते. भार्गवीने सांगितले की तिचे 90% क्लायंट आंतरराष्ट्रीय आहेत, जर ब्रँडिंग आणि मार्केटिंगची गरज असेल तर ती इतर देशांमध्ये तिच्या उत्पादनांचे ऑनलाइन मार्केटिंग करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात