कोमा, मृत्यू, अंत्यसंस्कार! मृत्यूच्या 10 तासांनंतर घडला अजब चमत्कार, डॉक्टरही झाले हैराण

कोमा, मृत्यू, अंत्यसंस्कार! मृत्यूच्या 10 तासांनंतर घडला अजब चमत्कार, डॉक्टरही झाले हैराण

मृत्यूच्या 10 तासांनंतर जिवंत झाली 83 वर्षीय महिला. डॉक्टर म्हणाला, अशी घटना कधी पाहिली नाही.

  • Share this:

युक्रेन, 28 फेब्रुवारी : मरणाच्या दाढेतून परतणाऱ्यांच्या अनेक गोष्टी आपण वाचल्या आहेत. पण कधी मृत्यू झाला आहे असं समजून पुन्हा जीवंत झाल्याची धक्कादायक घटना तुम्ही कधीच वाचली नसले. मात्र युक्रेनमध्ये असा प्रकार घडला आहे. येथील 83 वर्षांच्या महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर 10 तासांनी ही महिला पुन्हा जिवंत झाली. स्टीरजावका शहरातील रहिवासी जिनिया दिदुख ही निवृत्त परिचारिका असून गेल्या काही दिवसांपासून त्या स्टेज 3 कोमात होत्या.

वाचा-विज्ञानाचा चमत्कार! बघता बघता एका क्षणात Mr. India सारखी गायब झाली तरुणी

वाचा-अमृता खानविलकरचा स्टंट पाहून आईनं लावला डोक्याला हात, हा VIDEO एकदा पाहाच

जिनिया यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना घरी उपचारांसाठी बोलावले. पहिल्यांदाच डॉक्टर घरी आले तेव्हा त्यांनी पाहिले की जिनिया यांची प्रकृती खूप गंभीर असल्यामुळं त्यांनी घरीच उपचार केले. मात्र डॉक्टर निघून गेल्यानंतर जेनिया यांचा श्वासोच्छ्वास बंद झाला. यावेळी कुटुंबीयांनी डॉक्टरांसह पोलिसांनाही बोलावले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जिनिया मृत घोषित केले. त्यानंतर जिनिया यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू केली. जिनिया यांचे मृत्यू प्रमाणपत्रही स्थानिक अधिकाऱ्यांनी दिले. मात्रत त्यानंतर जे घडले त्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही.

वाचा-Tiktok वर प्रसिद्ध व्हायला गेला आणि मरता मरता वाचला, 2 कोटी लोकांनी पाहिला VIDEO

वाचा-मुंबईला धोका! येत्या काही वर्षात बुडणार शहर, 30 लाख लोकांना सोडावं लागेल घर

डॉक्टर म्हणाले - 37 वर्षांत अशी घटना पाहिली नाही

जेव्हा जिनिया यांचे कुटुंबिय अंत्यसंस्काराची तयारी करत होते, तेव्हा त्यांच्या मुलीला संशय आला. म्हणून जिनिया यांच्या मुलीने त्याच्या कपाळाला स्पर्श केला तेव्हा त्यांचे शरीर गरम होते. त्यानंतर त्या जीवंत असल्याचे जाणवल्यानंतर त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. त्यावेळी डॉक्टरांनीही जिनिया जिवंत असल्याचे मान्य केले. यावेळी डॉक्टरांनी, “37 वर्षांच्या कारकीर्दीत यापूर्वी असा प्रकार मी कधी पाहिला नव्हता,”, असे सांगितले. जिनिया यांना रुग्णालयात आणले गेले तेव्हा त्या स्टेज 3 कोमामध्ये होत्या, याचा अर्थ त्या जिवंत असूनही, हालचाल करत नव्हत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2020 01:38 PM IST

ताज्या बातम्या