मुंबई, 28 फेब्रुवारी : समुद्रातील पाण्याचा पातळी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं जगभरातील बरेच देश संकटात आहेत. याचा परिणाम स्वप्नांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारताची आर्थिर राजधानी असलेल्या मुंबईवरही होणार आहे. मॅक्किन्से इंडिया या कंपनीने केलेल्या अभ्यासानुसार, 2050 पर्यंत मुंबईत पाणी तुंबण्याच्या आणि पूराच्या तीव्रतेत 25 टक्क्यांची वाढ होणार आहे. तर, समुद्राच्या पातळीत 0.5 मीटर वाढ दिसून येणार. याचा थेट परिणाम किनारपट्टीच्या 1 किमी अंतरावर राहणाऱ्या दोन ते तीन लाक लोकांवर होणार आहे. वाचा-
कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्यांचा खिशाला कात्री, एसी आणि कुलर होणार महाग मॅक्किन्से इंडियाचे मुख्य डॉ. शिरीष सांखे यांनी मुंबईत आयोजित ‘क्लायमेट क्रायसिसः अॅक्शन फॉर ट्रॉपिकल कोस्टल सिटीज’ नावाच्या परिषदेत या अभ्यासाचे निष्कर्ष सादर केले. सांखे यांनी आपल्या अभ्यासात मुंबईची तुलना व्हिएतनाम, फ्लोरिडा या देशांच्या किनारपट्टीशी केली आहे. तसेच, त्यांनी “मुंबई 2050 पर्यंत समुद्रकिनाऱ्यावरील एक किमी अंतरावर राहणाऱ्या 2-3 लाख लोकांना समुद्रात 0.5 मीटरच्या वाढीचा परिणाम होईल. ही पातळी, 100 किमी प्रतितास वाऱ्याच्या वेगाने या पातळीत 1.5 पट वाढ होणार आहे. यामुळं मुंबईत पूराच्या तीव्रतेत 25 टक्क्यांनी वाढ होईल. आता, सरासरी खोली 0.46 मी आहे, 2050 पर्यंत ही खोली 0.8 मीटर होईल. तर सध्या 0.05 मीटर पेक्षा जास्त पूर क्षेत्र 46 टक्के आहे, जे 2050 पर्यंत 60 टक्क्यांपर्यंत जाईल”, असे सांगत हवामान बदलावर विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला. वाचा-
शेअर बाजाराला कोरोनाचा फटका, काही मिनिटांत 4 लाख कोटींचे नुकसान
2050 पर्यंत समुद्राच्या पातळीत होणारी वाढ.
वाचा- 3 दिवसांच्या बाळावर सुरीने केले 20 वार, निर्घृणतेचे कळस पाहून डॉक्टर हादरले 2050 पर्यंत जगभरातील अनेक शहरांवर होणार परिणाम याआधी प्रतिष्ठित जर्नल नेचर कम्युनिकेशननं प्रकाशित केलेल्या रिचर्सनुसार, समुद्रातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळं मुंबई शहर पूर्णपणे नष्ट होऊ शकते, असा धक्कादायक खुलासा करण्यात आला होता. या रिचर्समध्ये शास्त्रज्ञांनी सॅटेलाइटमधून आलेल्या फोटोंवरून हा निकष काढला होता. न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, सॅटेलाइटच्या मदतीनं समुद्रातील पाण्याच्या पातळीची गणना करण्यात आली होती. यावरून ही पातळी वाढत असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले होते.

)







