मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

ब्रिटीश पंतप्रधान वादाच्या भोवऱ्यात, लॉकडाऊनमध्ये ठेवली होती ‘TTMM’ दारु पार्टी

ब्रिटीश पंतप्रधान वादाच्या भोवऱ्यात, लॉकडाऊनमध्ये ठेवली होती ‘TTMM’ दारु पार्टी

एकीकडे देशात लॉकडाऊन सुरु होतं आणि दुसरीकडे देशाचे पंतप्रधान सार्वजनिक ठिकाणी पार्टी करण्यात व्यस्त होते. या घटनेचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.

एकीकडे देशात लॉकडाऊन सुरु होतं आणि दुसरीकडे देशाचे पंतप्रधान सार्वजनिक ठिकाणी पार्टी करण्यात व्यस्त होते. या घटनेचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.

एकीकडे देशात लॉकडाऊन सुरु होतं आणि दुसरीकडे देशाचे पंतप्रधान सार्वजनिक ठिकाणी पार्टी करण्यात व्यस्त होते. या घटनेचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.

  • Published by:  desk news

लंडन, 11 जानेवारी: पहिल्या लॉकडाऊनच्या (First Lockdown) काळात सर्व संकेत (Corona Rules) मोडून मद्यप्राशन पार्टी (Booze Party) आयोजित केल्याप्रकरणी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन (British PM Boris Johnson) यांच्यावर जोरदार टीका (Under Fire) होत आहे. सर्व देश लॉकडाऊनमध्ये असताना स्वतः पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या साथीनं सार्वजनिक ठिकाणी केलेली पार्टी ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या पार्टीचा व्हिडिओ माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. 

काय आहे प्रकरण?

2019 साली ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून झालेल्या निवडणुकीत बोरिस जॉन्सन यांना घवघवीत यश मिळालं होतं. त्यानंतर काही महिन्यात जगभरात कोरोनानं धुमाकूळ घातला आणि जगभरातील इतर देशांप्रमाणेच ब्रिटननेदेखील लॉकडाऊन जाहीर केला. याच काळात लंडनमधील एका बागेत पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील अनेक मान्यवरांना या पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं आणि या पार्टीत कोरोनासंबंधीच्या अनेक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं. 

पार्टी कशासाठी?

20 मे 2020 या दिवशी डाउनिंग स्ट्रिटवर या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. आपलं राजकीय वर्चस्व आणि हितंसंबध जोपासण्यासाठी नियम ओलांडून या पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा आरोप विरोधी मजूर पक्षानं केला आहे. या पार्टीचं निमंत्रण जॉन्सन यांच्या खासगी सचिवांनी ईमेलवरून पाठवलं होतं. त्यात सहभागी होण्यासाठी सर्वांना विनंती करण्यात आली होती आणि प्रत्येकाने येताना आपापलं मद्य घेऊन यावं, असंही सांगण्यात आलं होतं. 

हे वाचा -

एकीकडे लॉकडाऊन, दुसरीकडे पार्टी

ब्रिटनमध्ये 2020 साली पहिल्या लॉकडाऊनमध्ये मोठ्या संख्येनं सामान्यांचे मृत्यू होत होते. शाळा आणि महाविद्यालयं बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रवासावर बंदी असल्याने अनेकांनी आपापल्या घरातून कामे सुरू केली होती. अशा परिस्थितीत पंतप्रधान त्यांच्या मित्रमंडळींसह सार्वजनिक ठिकाणी दारु पार्टी कशी आयोजित करू शकतात, असा सवाल करत विरोधकांनी त्यांना घेरलं आहे. तर त्या तणावाच्या काळात सुंदर वातावरणाचा सुरक्षित पद्धतीनं आनंद घेण्यासाठीच हा प्रयोग केल्याचं जॉन्सन यांच्या खासगी सचिवांनी म्हटलं आहे. अद्याप ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

First published:

Tags: Britain, Lockdown, Party night, Prime minister