आपल्याला कोरोना होऊ नये, यासाठी प्रयत्न करणारे अनेकजण आपण पाहतो. मात्र काहीही करून आपल्याला कोरोना व्हावा, असा प्रयत्न करणारी व्यक्ती तुम्हाला माहित आहे? तिचं नाव आहे मॅडी स्मार्ट.
सिडनी, 11 जानेवारी: काहीही करून आपल्याला कोरोना (Corona) व्हावा, यासाठी एका महिलेचे (Lady) प्रयत्न सुरू असल्याचं नुकतंच एका व्हिडिओतून (Video) समोर आलं आहे. यासाठी ही महिला दिसेल त्याला मिठ्या (Hug) मारत सुटली असून कुठून ना कुठून आपल्याला कोरोनाचं इन्फेक्शन (Infection) होईल, ही आशा बाळगून आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या ओमिक्रॉनने (Omicron) धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. नव्या व्हेरिएंटपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अऩेक देश वेगवेगळे उपाय करत आहेत. नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं जात असून अनेक संस्था बंद किंवा मर्यादित उपस्थितीत सुरू ठेवण्यात येत आहेत. मात्र या महिलेला त्याचं काहीच सोयरसुतक नाही. तिला हवीय फक्त एकच गोष्ट. कोरोना व्हायरस. हे आहे कारणऑस्ट्रेलियातील टिकटॉक स्टार मॅडी स्मार्ट नावाच्या महिलेनं आपली ही कोरोना विषाणूच्या शोधाची गोष्ट शेअर केली आहे. मॅडीच्या म्हणण्यानुसार तिच्या लग्नाला आता केवळ सहा आठवडे बाकी आहेत. कोरोना इन्फेक्शनमुळे आपल्या लग्नात कुठलाही अडथळा येऊ नये, अशी तिची इच्छा आहे. कोरोनाचं इन्फेक्शन झाल्यावर साधारण दोन ते तीन आठवड्यात व्यक्ती पूर्ववत होत असल्यामुळे आपल्याला आत्ताच कोरोनाचं इन्फेक्शन व्हावं, असं तिला वाटतं. अद्याप आपल्याला कोरोनाचं एकदाही इन्फेक्शन झालं नाही. त्यामुळे ऐन लग्नाच्या काळात ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसं झालं, तर लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागेल आणि सगळ्या तयारीवर पाणी ओतल्यासारखं होईल. त्यामुळे काहीही करून आत्ताच कोरोना झाला, तर लग्नापर्यंत आपण त्यातून रिकव्हर होऊ आणि ठऱल्याप्रमाणे, ठरल्या तारखेला लग्न एन्जॉय करू असं तिला वाटत आहे. करते भन्नाट उपाययासाठी मॅडी वेगवेगळ्या क्लबमध्ये जाते आणि तिथं हजर असणाऱ्या प्रत्येकाची गळाभेट घेते. अनोळखी लोकांसोबत गप्पा मारत असताना स्वतःचा उष्टा ग्लास त्यांना देते आणि त्यातील पाणी पुन्हा स्वतः पिते. काहीही करून आपल्याला इन्फेक्शन व्हावं, यासाठी ती जंग जंग पछाडत आहे.
हे वाचा -
ऑस्ट्रेलियात गंभीर स्थितीऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याचं चित्र आहे. सध्या 10 लाखांचा आकडा कोरोना रुग्णसंख्येनं ओलांडला आहे. त्यातील निम्मी लोकसंख्या ही गेल्या 15 दिवसांत संक्रमित झालेली आहे. कित्येक राज्यांत निर्बंधही जारी करण्यात आले आहेत.
Published by:desk news
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.