Home /News /videsh /

BREAKING ब्रिटनला मोठा धक्का, पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोनाची लागण

BREAKING ब्रिटनला मोठा धक्का, पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोनाची लागण

या आधी प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोना झाल्याचं निदान झालं होतं. ब्रिटनमध्ये आत्तापर्यंत 11 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

  लंडन 27 मार्च : कोरोनाने ब्रिटनमध्येही थैमान घातलं आहे. बाधितांची संख्या वाढत असतानाच आज ब्रिटनला मोठा धक्का बसला. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांना कोरोना असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांना तातडीने आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या संपर्कात जे लोक आलेत त्यांनाही क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. जॉन्सन यांनीच आपल्या सोशल मीडियावरून एका व्हिडीओव्दारे त्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले, मला थोडासा ताप आलाय आणि कफही झाला आहे. मी कोरोनाची टेस्ट केली ती पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे मी सध्या घरात बसूनच काम करतो आहे. अशाही परिस्थितीत मी कोरोना विरुद्धच्या लढाईचं नेतृत्व करणार असून व्हिडीओ कॉन्फरन्स आणि इतर संपर्कांच्या साधनांनी प्रशासनाला निर्देश देणार असल्याचंही ते म्हणाले. हे वाचा - मुंबईत Coronavirus मुळे एका डॉक्टरचा मृत्यू; घरातले 6 जणही निघाले पॉझिटिव्ह या आधी प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोना झाल्याचं निदान झालं होतं. ब्रिटनमध्ये आत्तापर्यंत 11 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  578 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतही कोरोनाचं थैमान चीन आणि इटली नंतर आता कोरोनाने अमेरिकेत थैमान घातलं आहे. अमेरिकेचे आर्थिक राजधानी असलेले न्यूयॉर्क शहर हे कोरोनाचं केंद्र आहे. दररोज बाधित आणि मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्ये आत्तापर्यंत 385 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 37 हजार रुग्णांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय. सर्व अमेरिकेत कोरोनाबाधित असलेल्यांची संख्या 82 हजारांवर गेली असून त्याने चीनलाही मागे टाकलं आहे.

   हे वाचा - ...तर 4 महिन्यांत 25 लाख भारतीयांना होणार कोरोना, तज्ज्ञांनी दिला इशारा

  तर सर्व अमेरिकेतल्या मृत्यूचा आकडा 1200 झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास अमेरिकेत 80 हजार लोकांचा मृत्यू होवू शकतो अशी भीती Institute for Health Metrics and Evaluation ने (IHME) व्यक्त केली आहे. IHME ने यावर संशोधन केलं आहे. परिस्थिती अशीच राहिलं. त्यावर नियंत्रण मिळवलं नाही तर एप्रिल आणि मे महिन्यात दररोज  2300 जणांचा मृत्यू होवू शकतो असा अंदाजही IHMEच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  पुढील बातम्या