...तर 4 महिन्यांत 25 लाख भारतीयांना होणार कोरोना, तज्ज्ञांनी दिला इशारा

...तर 4 महिन्यांत 25 लाख भारतीयांना होणार कोरोना, तज्ज्ञांनी दिला इशारा

कोरोनाबाबत सर्वात मोठा रिपोर्ट, भारतासाठी धोक्याची घंटा. 4 महिने तरी मरणार नाही कोरोना.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च : कोरोनाला रोखण्यासाठी भारताने तयारी सुरू केली आहे. यासाठी संपूर्ण देशात सध्या लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. एकीकडे उन्हाळ्यात कोरोना तग धरणार नाही, असे मानले जात असताना भारतासाठी मात्र एक वाईट बातमी आहे. तज्ज्ञांच्या मते भारतात हा विषाणू आणखी 4 महिने असणार आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या या रिपोर्टमध्ये भारतासाठी येथे 4 महिने महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठ आणि द सेंटर फॉर डिसीज डायनेमिक्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी (CDDEP) यांनी तयार केलेल्या रिपोर्टमध्ये भारतातील सद्यपरिस्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे. दरम्यान, या रिपोर्टमध्ये कोरोनाला पराभूत करण्याचे मार्गही सांगितले गेले आहेत.

या रिपोर्टमध्ये, भारतात कोरोनाचा धोका जुलैच्या शेवट किंवा ऑगस्टच्या मध्यापर्यंत संपेल. यात पाच राज्यांचा आलेखदेखील दर्शवण्यात आला आहे. एप्रिलच्या मध्यापासून ते मे दरम्यान संपूर्ण देशातील बहुतेक लोकांना कोरोनाची लागण होईल आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल. त्यानंतर जुलैच्या मध्यापर्यंत ही संख्या कमी होत जाईल. ही परिस्थिती ऑगस्टपर्यंत संपेल अशी अपेक्षा आहे. या आलेखानुसार सुमारे 25 लाख लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते.

पत्नीला कोरोनाचा धोका, सचिनच्या नावाने पैसे गोळा करतोय न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

आयसोलेशन आणि लॉक डाऊन महत्त्वाचे

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, वृद्धांना याचा जास्त धोका आहे. त्यामुळे त्यांना आयसोलोशनमध्ये ठेवण्याची गरज आहे. जितके अधिक लॉकडाऊन असतील तितका भारताला फायदा आहे. सामाजिक अंतराशिवाय सध्या कोरोनाला हरवण्यासाठी दुसरा मार्ग नाही.

येते 2-3 महिने महत्त्वाचे

सर्वात मोठी समस्या भारतासमोर आहे ती वैद्यकिय सेवांची. येणाऱ्या काळात भारताला सुमारे 1 लाख व्हेंटिलेटरची आवश्यकता असेल. पण भारतात फक्त 30 ते 50 हजार व्हेंटिलेटर आहेत. अमेरिकेत 1.60 लाख व्हेंटिलेटर आहेत परंतु ते कमी पडत आहेत. त्यांची लोकसंख्या भारतापेक्षा कमी आहे. चीनलाही कोरोनातून बाहेर पडण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळे भारतात रुग्णालयांमधूनच संक्रमण होऊ नये याची काळजी घ्यावी लागणार आहे.

पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना धोका

या अभ्यासात असे नमुद करण्यात आले आहे की, पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कोरोनाचा धोका आहे. यासाठी आतापासून तयारी करणे गरजेचे आहे. भारतात आतापर्यंत कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये सर्वात जास्त संख्या ही 60 वर्षांच्या वरच्या वयोगटातील आहे.

धक्कादायक! 4 वर्षांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह, लहान मुलांमध्ये धोका वाढला

First published: March 27, 2020, 12:29 PM IST

ताज्या बातम्या