Home /News /videsh /

मोठी बातमी! ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत कोरोना लसीच्या मानवी चाचणीस सुरुवात

मोठी बातमी! ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत कोरोना लसीच्या मानवी चाचणीस सुरुवात

कोरोनाला नष्ट करण्यासाठी इंग्लंडमध्ये जगातील सर्वात मोठी ट्रायल घेण्यात येत आहे. कोरोनाच्या या लसीच्या चाचणीकडे जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.

    लंडन, 23 एप्रिल : कोरोना व्हायरसवर अद्याप कोणत्याही औषधाचा शोध लागलेला नाही. यावर लस शोधण्यासाठी अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे. दरम्यान, कोरोनाला नष्ट करण्यासाठी इंग्लंडमध्ये जगातील सर्वात मोठी ट्रायल घेण्यात येत आहे. कोरोनाच्या या लसीच्या चाचणीकडे जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. वैज्ञानिकांना आशा आहे की, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेलं वॅक्सिन  'ChAdOx1 nCoV-19'  चे पुढच्या काही आठवड्यात रिपोर्ट येतील. वॅक्सिनची मानवावर चाचणी गुरुवारपासून सुरू झाली आहे. यामध्ये यश मिळण्याचं प्रमाण 80 टक्के इतकं असल्याचं संशोधकांनी सांगितलं. इंग्लंड सरकारने यासाठी 20 मिलियन पौंडांची तरतूद केली आहे.  इंग्लंडच्या आरोग्य सचिवांनी सांगितंल की,  सरकार कोरोनाला रोखणारी लस शोधण्यासाठी जे करता येईल ते करण्यास तयार आहे. ब्रिटनमध्ये 165 रुग्णालयात तब्बल 5 हजार रुग्णांवर एक महिन्यापर्यंत आणि अशाच पद्धतीने युरोप आणि अमेरिकेतील शेकडो लोकांवर या लसीचे परीक्षण होणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर पीटर हॉर्बी यांनी सांगितलं की, ही जगातील सर्वात मोठी चाचणी आहे. पीटर हॉर्बी हे याआधी इबोलाच्या औषधाची ट्रायल घेणाऱ्या टीमचे नेतृत्व करत होते. दरम्यान, ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांनी दावा केला आहे की, दोन वॅक्सिन यावेळेला सर्वात पुढे आहेत. एक ऑक्सफर्डमध्ये आणि दुसरी इम्पिरियल कॉलेजमध्ये तयार केली जात आहे. हॉर्बी यांनी इशाराही दिला आहे की, कोरोनाच्या प्रकरणात कोणती जादू होऊ शकत नाही. इंग्लंडने 21 नवीन संशोधन प्रोजेक्ट सुरू केले आहेत. यासाठी इंग्लंडच्या सरकारने 1.4 कोटी पौडांची तरतूद केली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 10 लाख वॅक्सिन डोस तयार करण्याची तयारी सुरू आहे. हे वाचा : भारतानं करून दाखवलं! मोदींचा प्लॅन यशस्वी; ही घ्या अमेरिकेच्या तुलनेतली आकडेवारी ऑक्सफर्डमध्ये तयार करण्यात येणाऱ्या वॅक्सिनची चाचणी सर्वात आधी तरुणांवर केली जाणार आहे. ती यशस्वी झाल्यास इतर लोकांवर याची चाचणी केली जाईल. काहीही झालं तरी सप्टेंबरपर्यंत दहा लाख डोस तयार करायची इच्छा आहे. एकदा वॅक्सिन  आणि त्याच्या क्षमतेबद्दल समजलं की ते वाढवण्याचं काम करता येईल. जगात याची कोट्यवधींच्या क्षमतेनं गरज असेल. वॅक्सिनची यशस्वी चाचणी होईपर्यंत सोशल डिस्टन्सिंग हाच एक पर्याय आहे. हे वाचा : 'कोरोना कधी जीव घेईल काय माहित', डॉक्टर दाम्पत्यानं बनवलं लेकासाठी मृत्यूपत्र
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या