Home /News /videsh /

रात्रीतून अंगणात उतरला UFO, तरुणीला दिसली भयंकर गोष्ट

रात्रीतून अंगणात उतरला UFO, तरुणीला दिसली भयंकर गोष्ट

अमेरिकेतील एका तरुणीच्या बागेत रातोरात एक तबकडी (UFO in Garden) आढळून आल्यामुळं एलियनच्या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे.

    न्यूयॉर्क, 8 ऑगस्ट : जगात एलियन (Aliens) आहेत की ती केवळ मानवी कल्पना आहे, यावरून अनेक वादविवाद सतत होतच असतात. काहीजणांच्या मते एलियन असतात आणि ते गुपचूप पृथ्वीवर येऊन जातात. तर काहीजणांच्या मते एलियन ही केवळ मानवी कल्पना असते. वास्तविक एखादा युएफओ  लवदिसल्यावर त्याला लोक एलियन समजतात. सध्या अमेरिकेतील एका तरुणीच्या बागेत रातोरात एक तबकडी (UFO in Garden) आढळून आल्यामुळं एलियनच्या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. अमेरिकेत एरिझोना भागात राहणाऱ्या एली मुर्राय या तरुणीच्या बागेत पहाटेच्या सुमाराला एक तबकडी आल्याचं तिला दिसलं. रात्री झोपताना ही वस्तू इथं नव्हती, तर सकाळी कुठून आली, असा प्रश्न तिला पडला. तिनं सरळ आपला मोबाईल बाहेर काढला आणि त्या तबकडीचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. सुरुवातीला या तबकडीतून एलियन आला असावा, असं वाटल्याने ती हळूहळू एक एक पाऊल टाकत त्या तबकडीकडे गेली. हा व्हिडिओ लाईव्ह पाहणाऱ्या काहीजणांनी तिला काळजी घेण्याचा आणि जपून पुढे जाण्याचा सल्ला दिला. काही वेळाने त्या तबडकीत एक चमकणारी वस्तू व्हिडिओत दिसली. हा व्हिडिओ पाहणाऱ्या काहीजणांनी एलीला ताबडतोब तिथून दूर जाण्याचा सल्ला दिला. ते एलियनचे डोळे असावेत, असं काहीजणांना वाटलं. तर ती एक भयंकर गोष्ट असून त्यापासून मानवाला धोका पोहोचू शकतो, असंही काहीजण म्हणाले. तर काहीजणांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावत तबकडीत पाणी साठल्यामुळे, त्यात मोबाईलचे लाईट दिसले असावेत, असं म्हटलं आहे. हे वाचा - बापरे! मजेमजेत चक्क सिंहाच्याच तोंडात टाकला हात; पुढे काय घडलं पाहा VIDEO अमेरिका आणि एलियन अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एलियन आल्याच्या घटना घडत असून त्याची माहिती लपवून ठेवली जात असल्याचा आरोप काहीजण करत आहेत. तर एलियन ही केवळ कल्पना असून पाणी, हवा आणि प्रकाशाच्या संयोगातून काही चमत्कारित आकृती निसर्गात तयार होतात. त्यालाच नागरिक एलियन म्हणत असल्याचं काही वैज्ञानिक सांगतात.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Aliens, America

    पुढील बातम्या