• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • आली लहर, केला कहर! या दोघांनी जमिनीत गाडले हजारो डॉलर, सापडतील त्याने घेऊन जा; असं दिलंय चॅलेंज

आली लहर, केला कहर! या दोघांनी जमिनीत गाडले हजारो डॉलर, सापडतील त्याने घेऊन जा; असं दिलंय चॅलेंज

कोरोना काळात सर्वसामान्यांच्या मनात दाटळेलं मळभ दूर करण्यासाठी अमेरिकेतील दोन मित्रांनी अनोखी शक्कल लढवली. दोघांकडचे मिळून 5 हजार अमेरिकी डॉलर्स (सुमारे 3 लाख 70 हजार रुपये) एका पेटीत घातले आणि ती पेटी डोंगराळ भागातील एका ठिकाणी खड्डा खणून पुरून टाकली.

 • Share this:
  न्यूयॉर्क, 28 जून : कोरोनामुळे (Coronavirus) गेल्या दीड वर्षांपासून अख्खं जग घरात बसलं आहे. त्यामुळे उद्योगधंदे (Businesses) आणि अर्थव्यवस्थेवर (Economy) तर परिणाम झाला आहेच, मात्र अनेकांच्या मानसिकेतवरही (Psychology) त्याचा परिणाम झाला आहे. कोरोना काळात सर्वसामान्यांच्या मनात दाटळेलं मळभ दूर करण्यासाठी अमेरिकेतील दोन मित्रांनी (Two friends in US) अनोखी शक्कल लढवली. अशी होती शक्कल अमेरिकेतील जॉन मेक्सिम (Johm Mexim) आणि डेव्हिड क्लीन (David Clean) यांनी यासाठी एक अनोखी ‘आयडियाची कल्पना’ शोधून काढली. ‘खजाने की खोज’ प्रकारातला एक गेम त्यांनी निश्चित केला आणि त्यासाठी स्वतःकडचे पैसे वापरण्याचं ठरवलं. दोघांकडचे मिळून 5 हजार अमेरिकी डॉलर्स (सुमारे 3 लाख 70 हजार रुपये) एका पेटीत घातले आणि ती पेटी डोंगराळ भागातील एका ठिकाणी खड्डा खणून पुरून टाकली. हे काम झाल्यावर त्यांनी आपल्या गेमची सोशल मिडियावरून घोषणा केली. डोंगराळ भागात 5 हजार डॉलर्स ठेवलेली पेटी लवपण्यात आली असून ती शोधून काढण्यात ज्याला यश मिळेल, त्याला त्या पेटीतील सर्वच्या सर्व रक्कम बक्षीस म्हणून मिळेल, अशी ती घोषणा होती. बघता बघता ही घोषणा व्हायरल झाली आणि अनेक अमेरिकी नागरिकांनी लपवलेली पेटी शोधण्यासाठी डोंगराकडे धाव घेतली. काही वेळात एकाला ती पेटी सापडली आणि त्या पेटीतील 5 हजार डॉलर्सचं बक्षीस घेऊन ती व्यक्ती निघूनदेखील गेली. अनेकांनी केवळ आनंदासाठी या स्पर्धेत भाग घेतला होता, तर काहीजण काहीही करून पेटील मिळवायचीच, असा चंग बांधून आले होते. यातील दुसऱ्या प्रकारच्या नागरिकांचा अखेर खोडासा हिरमोडच झाला. हे वाचा - खराखुरा टार्झन सापडला; 41 वर्षे प्राण्यांमध्ये राहिला, महिलांची माहितीच नाही आता दुप्पट बक्षीस पहिला प्रयोग यसश्वी झाल्यानंतर आता या दोघांनी 19 हजार डॉलर्स जमिनीत गाडून ठेवले आहेत. लोकांनी सुरक्षित आणि आनंदानं घराबाहेर पडावं, यासाठी काही ना काही करावं, असं या दोघांनाही वाटत होतं. त्यातूनच ही कल्पना साकारली गेल्याचं जॉन आणि डेव्हिड यांनी ‘फॉक्स न्यूज’ शी बोलताना सांगितलं.
  Published by:desk news
  First published: