• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • शेवटी खराखुरा टार्झन सापडला; 41 वर्षे प्राण्यांमध्ये राहिला, महिलांबद्दल विचारलं तर चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह!

शेवटी खराखुरा टार्झन सापडला; 41 वर्षे प्राण्यांमध्ये राहिला, महिलांबद्दल विचारलं तर चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह!

तुम्ही आतापर्यंत टार्झनबद्दल ऐकलं वा वाचलं असेलच. अगदी त्याचे चित्रपटही पाहिले असतील. मात्र जगात खराखुरा टार्झन असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, जून 26 : तुम्ही आतापर्यंत टार्झनबद्दल ऐकलं वा वाचलं असेलच. अगदी त्याचे चित्रपटही पाहिले असतील. मात्र जगात खराखुरा टार्झन असल्याचं वृत्त समोर आलं आहे. विएतनाममध्ये राहणाऱ्या एका 49 वर्षांची व्यक्ती हो वान लांग गेल्या 41 वर्षांपासून आपले वडील आणि भावासंह घनदाट जंगलांमध्ये राहत होती. आश्चर्य म्हणजे त्यांला जगात महिला असतात याबद्दल माहितीही नाही. जगभरात सध्या हा खराखुरा टार्झन म्हणून समोर आला आहे. (real Tarzan finally found Lived in animals for 41 years don't know about women) 40 वर्षांत केवळ 5 जणांना पाहिलं 1972 मध्ये विएतनाम युद्धाच्या शेवटी हो वान लांग यांची आई आणि दोन भाऊ-बहिणींचा अमेरिकेतील हल्ल्याचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर ते आपल्या वडिलांसह गाव सोडून लांग क्वांग येथील ताई ट्रा जिल्ह्यातील घनदाट जंगलात राहत होते. गेल्या चार दशकात त्यांनी फक्त 5 जणांचा पाहिलं आहे आणि प्रत्येक वेळी ते माणसांपासून लांब पळतात. हो वान आपले वडील आणि भावासोबत घटदाट जंगलात राहत होता. ते मध, फळं, आणि जंगली प्राणी खाऊन पोट भरत असे. जंगलात राहण्यासाठी त्यांनी एक छोटसं घरदेखील तयार केलं होतं. 2015 मध्ये फोटोग्राफर अल्वारो सेरेज़ो यांनी या जंगलात राहणाऱ्या कुटुंबाची माहिती मिळवली होती. त्याने तिघांना जंगलातून रेस्क्यू केलं होतं. ज्यानंतर त्यांना स्थानिक गावात नेण्यात आलं. आता एका छोट्याशा विएतनामी गावात राहणारं हे कुटुंब तेथील लोकांसोबत मिसळून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. हे ही वाचा-खोदा पहाड निकला..; हिरा आढळल्याचं ऐकून हजारो लोकांनी दिवसरात्र केलं खोदकाम,अन्.. विएतनाम युद्धाच्यावेळी गाव सोडलं होतं.
  अल्वारो सेरेजो यांनी या प्रकरणाबाबत सांगितलं की, या युद्धामुळे हो वान यांच्या वडिलांची मानसिक स्थिती बिघडली होती. त्यामुळे युद्ध संपल्यानंतरही ते जंगलात राहत होते. हो वान यांच्या वडिलांना खूप भीती होती, कारण त्यांना विएतनाम युद्ध समाप्त झालं यावर विश्वासच बसत नव्हता. वानचे वडील जेव्हा कधी जंगलात माणसांना पाहत, ते त्यांच्यापासून लपत असे. याहून अधिक आश्चर्यकारक बाब म्हणजे अजूनही ते पुरुष आणि महिलांमधील भेद ओळखू शकत नाहीत.
  हो वान अद्यापही लहान मुलांसारखा.. अल्वारो यांचं म्हणणं आहे की, लांग याला कधीच लैंगिक इच्छा झाली नाही, याची मी पुष्टी करू शकतो. तर लांगच्या भावाने सांगितलं की, त्याचा मेंदू अद्यापही लहान मुलांप्रमाणे आहे. त्याला सामाजिक नियमांबाबत फारशी माहिती नाही. लांगने आपलं संपूर्ण आयुष्य जंगलात घालवलं आहे. त्यामुळे त्याचा मेंदू एखाद्या लहान मुलाप्रमाणे आहे. जर मी लांगला कोणाला मारायला सांगितलं तर तो ते काम खूप निष्ठेने करेल. तो चांगलं आणि वाईट यामध्ये फरक करू शकत नाही. कारण अजूनही तो लहान मुलाप्रमाणे आहे. वानला उंदरांचे डोके खायला आवडतात.. पुढे लांगच्या भावाने सांगितलं की, सर्वसाधारणपणे काय चांगलं आणि काय वाईट याची प्रत्येकाला जाण असते. मात्र वांगला हे माहित नाही. लांगला जेव्हा महिलांबाबत विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की, वडिलांनी याबाबत मला काहीच सांगितलं नाही. गावात आल्यानंतर त्याने पहिल्यांदा महिलांना पाहिलं. हे कुटुंब बरीच वर्षे जंगलात राहत होतं. त्यामुळे त्यांच्या राहण्याच्या सवयी माणसांहून खूप वेगळ्या आहेत. ते जंगलात माकड, पाल, साप आणि इतर प्राणी खात होते. हो वानला उंदराचे डोके सर्वाधिक आवडतात. गावात परतल्याच्या 8 वर्षांनंतरही वानला नीट बोलता येत नाही. त्यामुळे तो इशाऱ्यांमध्येच संवाद साधतो.
  Published by:Meenal Gangurde
  First published: