क्रुरतेचा कळस! इन्स्टाग्राम LIVE करत हत्येचा थरार, जुळ्या बहिणींना निर्दयीपणे संपवलं

एका भयंकर घटनेच्या लाईव्ह व्हिडीओनं सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. अवघ्या 18 वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींची (Twin Sisters Shot Dead) अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली

एका भयंकर घटनेच्या लाईव्ह व्हिडीओनं सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. अवघ्या 18 वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींची (Twin Sisters Shot Dead) अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली

  • Share this:
सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ सतत शेअर केले जातात. अनेक व्हिडीओ मनोरंजन करणारे तर काही माहिती देणारे असतात. काही व्हिडीओ अतिशय दुःखदायक असतात. दहशत पसरवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने या माध्यमाचा वापर केला जातो. क्रूर घटनांचे व्हिडीओ शेअर करण्याबरोबरच त्यांच थेट प्रसारण (Live) करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशाच एका भयंकर घटनेच्या लाईव्ह व्हिडीओनं सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. हा व्हिडीओ ब्राझीलमध्ये (Brazil) घडलेल्या एका क्रूर घटनेचा आहे. ब्राझीलमध्ये अवघ्या 18 वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींची (Twin Sisters Shot Dead) अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली असून, हत्या करणाऱ्या लोकांनी त्याचा लाईव्ह व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Live on Instagram) शेअर केला आहे. द सनच्या वृत्तानुसार, ब्राझीलमधील पेकाजस भागात ही घटना घडली आहे. 18 वर्षांच्या अमालिया (Amalia) आणि अमांडा अल्वेस (Amanda Alves) या दोघी बहिणींना मारेकऱ्यांनी आधी घराबाहेर काढले आणि काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना एकमेकींना घट्ट धरण्यास सांगितलं, नंतर त्यांना जमिनीवर बसण्यास सांगून पाठीमागून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. हा सगळा प्रकार इन्स्टाग्रामवर लाईव्ह प्रसारित करण्यात आला. यामुळे या भागात भीतीचं वातावरण पसरलं आहे. हे वाचा-ड्रोनद्वारे या देशात पाडला कृत्रिम पाऊस, 50 डिग्री तापमानात नागरिकांना दिलासा दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी एका सतरा वर्षाच्या मुलाला अटक केली आहे. या आधीही त्याला वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आलेली आहे. या दोघी बहिणींची हत्या करण्यामागे काय कारण असावं याचा उलगडा पोलिसांना अद्याप झालेला नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या दोघींच्या हत्येमागे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या गटाचा (Drug Dealers) हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इथल्या जोर्नल दी ब्राझिलिया (Jornal De Brasilia) या स्थानिक वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, अमालिया आणि अमांडा अल्वेस या दोघी बहिणींना अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या स्थानिक ड्रग माफियांबद्दल खूप माहिती होती. हीच गुप्त माहिती त्यांच्या हत्येचं कारण ठरल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. हे वाचा-घरादारात पावसाचं पाणी शिरलं असतानाही बँडवाल्या तरुणांची कोळी गीतांवर तुफान धमाल या दोघींपैकी अमांडाला तीन वर्षांची मुलगी असून अमालीया नुकतीच आई बनली होती. या दोघींच्या हत्येमुळे दोघींची मुलं आईच्या प्रेमाला पारखी झाली आहेत. त्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, या दोघींच्या अशा क्रूर हत्येमुळे लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे
First published: