ड्रोन्सचा वापर करुन या देशात पाडला कृत्रिम पाऊस, 50 डिग्री तापमानात नागरिकांना दिलासा

दुबईसह (Dubai) आसपासच्या भागांमध्ये नुकत्याच झालेल्या प्रचंड पावसाने मोठा दिलासा दिला, पण हा पाऊस आपोआप झालेला नैसर्गिक पाऊस नव्हता.

दुबईसह (Dubai) आसपासच्या भागांमध्ये नुकत्याच झालेल्या प्रचंड पावसाने मोठा दिलासा दिला, पण हा पाऊस आपोआप झालेला नैसर्गिक पाऊस नव्हता.

  • Share this:
नवी दिल्ली, 22 जुलै: अमेरिका, कॅनडा, चीन, ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates - UAE) आदी अनेक देशांमध्ये सध्या भयंकर उन्हाळा (Heat) सुरू आहे. तिथलं तापमान असह्य पातळीवर म्हणजेच तब्बल 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. संयुक्त अरब अमिरातीत पारा 50 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. 35 ते 40 अंश सेल्सिअस तापमानही अक्षरशः अस्वस्थ करतं. त्यामुळे पाऱ्याने पन्नाशी गाठल्याने परिस्थिती भयंकर आहे. नागरिकांचा, तसंच पशु-पक्ष्यांचाही मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर दुबईसह (Dubai) आसपासच्या भागांमध्ये नुकत्याच झालेल्या प्रचंड पावसाने मोठा दिलासा दिला, पण हा पाऊस आपोआप झालेला नैसर्गिक पाऊस नव्हता. प्रचंड उन्हाळ्यापासून थोडा तरी दिलासा मिळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या हवामान विभागाने कृत्रिम पावसाचा (Artificial Rain) प्रयोग केला होता. तो यशस्वी झाला. दुबईसह आजूबाजूच्या परिसरांमध्ये झालेल्या प्रचंड पावसाचा व्हिडीओ UAE च्या हवामान विभागाने रविवारी प्रसिद्ध केल्याचं वृत्त डेली मेलने दिलं आहे. प्रचंड पावसामुळे सर्वत्र झरे वाहत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती हा नैसर्गिक पाऊस नव्हता, तर तो कृत्रिम पद्धतीने पाडलेला पाऊस होता, असं स्पष्टीकरण हवामान विभागाने दिलं आहे. ड्रोन्सचा वापर करून ढगांना विद्युतभारित करण्यात आलं आणि त्यामुळे ढगांमधून जलवर्षाव झाला. या पद्धतीत ढगांना विजेचा जोरदार झटका दिला जातो. त्यामुळे ढगांमध्ये घर्षण होतं आणि पाऊस पडू लागतो. संयुक्त अरब अमिरातीमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगमधले तज्ज्ञ अशा प्रकारच्या पावसावर संशोधन करत आहेत. या योजनेवर कार्यरत असलेले प्रा. मार्टेन अंबाउम यांनी या वर्षाच्या सुरुवातीला बीबीसीला सांगितलं होतं, की संयुक्त अरब अमिरातीमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आवश्यक ढग अस्तित्वात आहेत. ते ढग अस्तित्वात नसले, तर कृत्रिम पावसाचं तंत्र वापरता येत नाही. त्यामुळे त्या दृष्टीने तरी यूएई सुदैवी आहे. चीनमध्ये चार दिवसात पडला वर्षभराचा पाऊस, एका तासात कहऱ, पाहा Video क्लाउड सीडिंग (Cloud Seeding) नावाच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पावसाचं प्रमाण वाढवण्यात आल्याचं हवामान विभागाने सांगितलं. देशातलं सरासरी पाऊसमान वाढवण्याचा उद्देश त्यामागे आहे. त्यासाठी मिशन मोडवर क्लाउड सीडिंग ऑपरेशन सुरू असल्याचं यूएईने स्पष्ट केलं आहे. या तंत्राद्वारे ढगांमध्ये विद्युतभार (Electrically Charged Cloud) निर्माण होण्यासाठी एका ड्रोनचा (Drone) वापर केला जातो. जलबिंदूंना एकत्र जोडण्यात त्याचं साह्य होतं आणि पाऊस पडू लागतो. या मोहिमेवर आतापर्यंत 15 दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत. कारण यूएईचा समावेश जगातल्या सर्वांत तीव्र दुष्काळी असलेल्या 10 देशांमध्ये होतो. तिथलं सरासरी पाऊसमान केवळ तीन इंच म्हणजे 78 मिलिमीटर एवढंच आहे.
First published: