सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस सुरू आहे. सातत्याने बरसणाऱ्या सरींमुळे नागरिकांच्या नाकी नऊ आले आहेत. आधीच कोरोनाची भीती त्यात अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे टेन्शन वाढलं आहे. असं असलं तरी सध्या एक सकारात्मकता वाढविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोकणात पावसाचं धुमशान सुरू आहे. यामध्ये हा व्हिडीओ एक वेगळीच ऊर्जा देईल. एकीकडे मुसळधार पावसामुळे घरादारात पुराचे पाणी शिरलेले असताना हे बँडवाले तरुण होडीतून फिरत वल्ल्हव रे नाखवा या गाण्याच्या धुनवर मजा करत आहेत. पुराच्या संकटातही यांच्या या धमाल मस्तीने इथल्या रहिवाशांचा थोडासा का होईना, ताण नक्की कमी नक्की कमी केला असेल यात शंका नाही. हा व्हिडीओ कोकणातील असल्याचं सांगितलं जात असून सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. हे ही वाचा- सायकलवरुन पार्सल डिलीव्हर करणाऱ्या Zomato बॉयला गिफ्ट केली बाईक, पाहा VIDEO
घरादारात पुराचं पाणी शिरलेले असताना एका गावातील बँडवाले कोळी गाण्यावर मजा करीत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. pic.twitter.com/SXbV45Me25
— News18Lokmat (@News18lokmat) July 21, 2021
काहींच्या मते हा जुना व्हिडीओ असून सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. हवामान खात्यानं आज मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात जोरदार पावसाची बॅटिंग सुरू. दरम्यान आकाशात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होत आहे.

)







