Home /News /videsh /

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीयांना झटका, H1-B व्हिजाबाबत घेतला मोठा निर्णय

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीयांना झटका, H1-B व्हिजाबाबत घेतला मोठा निर्णय

अमेरिकेत जायचं स्वप्न बघत असणाऱ्यांना मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.

    वॉशिंग्टन, 23 जून : अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्या सर्वात जास्त आहे. यातच लॉकडाऊनमध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळली आहे. यातच आता भारतीयांना झटका देणारा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. ट्रम्प यांनी H1-B व्हिसा निलंबित करण्याची घोषणा केली आहे. यामुळे भारतासह जगातील आयटी व्यावसायिकांना मोठा धक्का बसला आहे. हे निलंबन वर्षाच्या शेवटपर्यंत असणार आहे. ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय अमेरिकन कामगारांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. सद्य आर्थिक संकटामुळे नोकरी गमावलेल्या अमेरिकन लोकांना मदत करण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुका होण्यापूर्वी ही घोषणा करीत ट्रम्प यांनी विविध व्यावसायिक संघटना, कायदेशीर आणि मानवाधिकार संस्था यांच्या वाढत्या विरोधाकडे दुर्लक्ष केले आहे. वाचा-दोन महिन्यात 2.21 कोटी लोकांनी गमावल्या नोकऱ्या; तरी ट्रम्प का आहेत बिनधास्त? हे निलंबन 24 जूनपासून लागू होईल. याचा परिणाम मोठ्या प्रमाणात भारतीय आयटी व्यावसायिकांना बसण्याची शक्यता आहे. आता त्यांना स्टम्पिंगआधी त्यांना वर्षाच्या अखेरीपर्यंत थांबावे लागेल. त्याचा मोठ्या प्रमाणात भारतीय आयटी व्यावसायिकांवरही परिणाम होईल ज्यांना त्यांचा H1-B व्हिसा रिन्यू करण्याची इच्छा होती. अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या अडीच लाख लोकांना याचा फटका बसू शकतो. सध्या अमेरिकेत असणाऱ्या भारतीयांना मात्र या नवीन नियमांमुळे फारसा फरक पडणार नाही. काय आहे H1-B व्हिसा अमेरिकेत काम करणार्‍या कंपन्यांना परदेशी कामगारांकडून मिळालेल्या व्हिसाला H1-B व्हिसा म्हणतात. हा व्हिसा निश्चित कालावधीसाठी दिला जातो. H1-B व्हिसा हा गैरप्रवासी व्हिसा आहे. अमेरिकेत काम करणार्‍या कंपन्यांना हा व्हिसा अमेरिकेत कमतरता असलेल्या कुशल कर्मचार्‍यांना काम देण्यासाठी दिला जातो. या व्हिसाची वैधता सहा वर्षांची आहे. अमेरिकन कंपन्यांच्या मागणीमुळे भारतीय आयटी व्यावसायिकांना हा व्हिसा सर्वाधिक मिळतो. वाचा-कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषध कोरोनिल तयार, पतंजली आज जगासमोर आणणार अमेरिकेतील बेरोजगारी वाढली अमेरिकेत मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाव्हायरस (Coronavirus) रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. परिणामी या दोन महिन्यात तब्बल 2.21 कोटी लोकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या. एप्रिल महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर 14.7 होता. अमेरिकेत 1948नंतर पहिल्यांदाच इतकी वाईट परिस्थिती आहे. मे महिन्यात बेरोजगारीचा दर 13.3 टक्क्यांनी घसरला, तर या महिन्यात 25 लाख लोकांनी नोकर्‍या गमावल्या. संकलन-प्रियांका गावडे.
    First published:

    पुढील बातम्या