भारतात एका महिन्यात 5 पटीने वाढले कोरोनाचे रुग्ण, जून असेल अधिक धोकादायक

भारतात एका महिन्यात 5 पटीने वाढले कोरोनाचे रुग्ण, जून असेल अधिक धोकादायक

1 मे रोजी भारतात कोरोना रूग्णांची संख्या 37,257 इतकी होती. जी आता 1 जूनपर्यंत 1.90 लाखांच्या पलीकडे गेली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 जून : 2020 चा वर्षाची 1 जून ही तारीख भारतासाठी खूप खास आहे. ही तारीख आहे जेव्हा देश लॉकडाऊन वरून अनलॉक (अनलॉक -1) वर गेला आहे. आता कोरोनाच्या संसर्गाचा धोका भारतात कमी झाला आहे का? सध्याच्या परिस्थितीत हे सांगणे कठीण आहे.

भारतात मागील दिवसात कोरोना विषाणूचे प्रमाण पाच पटीने वाढले आहे. आता आपण जे ट्रेंड पाहत आहोत त्यावरून असे म्हणता येईल की कोविड -19 च्या केसेस जूनमध्ये झपाट्याने वाढणार आहेत. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूबद्दल कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे फार लवकर आहे.

1 जूनपर्यंत भारतात कोरोना विषाणूची 1 लाख 90 हजार 535 रुग्णांची  नोंद करण्यात आली आहेत. यापैकी 5394 लोक मरण पावले आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8392 रुग्ण आढळले आहेत आणि 230 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत चोवीस तासात मृतांचा आकडा हा सर्वात जास्त आहे.

1 मे रोजी 37 हजार रुग्ण होते

1 मे रोजी भारतात कोरोना रूग्णांची संख्या 37,257 इतकी होती. जी आता 1.90 लाखांच्या पलीकडे आहे. यावरुन हे स्पष्ट आहे की मे महिन्यात, कोरोनाचे रुग्ण भारतात 5 पटीने वाढले. कोरोना साथीच्या आजाराने ग्रस्त देशांच्या यादीत भारत आता सातव्या क्रमांकावर आला आहे.

जून हा भारतासाठी अधिक धोकादायक 

तज्ज्ञांच्या मते आशियाई आणि दक्षिण अमेरिकन देशांसाठी जूनचा महिना  फार महत्वाचा आहे. जर आपण भारताचे उदाहरण समोर ठेवून पाहिले तर येथे एप्रिल आणि मेमध्ये नवीन प्रकरणांची संख्या सातत्याने वाढत होती. तेही लॉकडाऊन चालू असतानाच. 1 जूनपासून भारतात लॉकडाउनच्या ठिकाणी अनलॉक -1 लागू करण्यात आला आहे. आपण त्या नावावरून अंदाज लावू शकता की लॉकडाऊनचे निर्बंध भारतातून हळूहळू हटविले जाणार आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगदेखील कमी होईल. अद्यापही  बाजारात कोरोनाविरोधात कोणतेही औषध नाही. त्यामुळे जूनमध्ये कोरोनाची संख्या अधिक वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

हे वाचा-Real Fighter..5 महिन्यांचा जीव, 30 दिवस व्हेंटिलेटरवर; अखेर कोरोनाचा लढा जिंकलाच

First published: June 1, 2020, 8:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading