कोरोनाचा उद्रेक: अमेरिकेत पुढच्या 30 दिवसांमध्ये होऊ शकतात 20 हजार मृत्यू

कोरोनाचा उद्रेक: अमेरिकेत पुढच्या 30 दिवसांमध्ये होऊ शकतात 20 हजार मृत्यू

जगात आत्तापर्यंत 63 लाख 21 हजार 340 जण बाधित आहेत. तर 3 लाख 75 हजार 657 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

 न्यूयॉर्क 2 जून: अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक काही शांत झालेला नाही. कोरोनाविरुद्ध लढत असतानाच अमेरिकेत हिंसाचाराचं लोनही पसरलं आहे. परिस्थिती अशी गंभीर बनलेली असताना आणखी एक धोक्याचा इशारा आला आहे. पुढच्या 30 दिवसांमध्ये कोरोनामुळे 20 हजार मृत्यू होऊ शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) चे माजी संचालक टॉम फ्रिडेन यांनी हा इशारा दिला आहे. कोरोनाच्या संकटापासून आपण दूर जात असल्याचा गैरसमज लोकांमध्ये आहे असंही ते म्हणाले. लोकांनी पूर्वीसारखीच काळजी घेतली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.

जगात आत्तापर्यंत 63 लाख 21 हजार 340 जण बाधित आहेत. तर 3 लाख 75 हजार 657 जणांचा मृत्यू झाला आहे.  28 लाख 81 हजार 224 जण कोरोना मुक्तही झाले आहेत.

डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाला, त्यानंतर हा व्हायरस जगभर पसरला. त्यामुळे चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण असावा असं आतापर्यंत म्हटलं जातं. मात्र कोरोनाचा पहिला रुग्ण हा चीन नव्हे तर फ्रान्समध्ये (France) होता, असा दावा फ्रान्सच्या डॉक्टरांनी केला आहे.

ना लॉकडाऊन, ना मोठ्या प्रमाणात टेस्ट; 'या' सवयीने जपानला कोरोनापासून वाचवलं

उत्तर-पूर्व फ्रान्सच्या कॉलमारमधील अल्बर्ट श्वित्जर हॉस्पिटलमधील डॉ. माइकल श्मिट यांच्या टीमने दावा केला आहे की, चीनमध्ये कोरोनाव्हायरसचं पहिलं प्रकरण समोर आलंच नसावं कारण नोव्हेंबरमध्ये युरोपमध्ये या संक्रमणाने पाय रोवले होते.

डेली मेलमधील रिपोर्टनुसार डॉक्टरांनी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये रुग्णालयात फ्लूची समस्या घेऊन आलेल्या 2500 पेक्षा जास्त रुग्णांच्या एक्स-रे रिपोर्टचा अभ्यास केला. नोव्हेंबरमध्येच 2 एक्स-रे रिपोर्ट असे आहेत, ज्यामध्ये कोरोनाव्हायरसची पुष्टी झाली.

COVID-19 : तीन भारतीय कंपन्यांना मिळाला NASA चे व्हेंटिलेटर बनवण्याचा परवाना

16 नोव्हेंबरला एका व्यक्तीचा एक्स-रे काढण्यात आला होता. ज्याचा रिपोर्ट पाहिल्यानंतर त्याला कोरोना संक्रमण होतं हे स्पष्ट होतं. याच व्यक्तीचा दुसऱ्या दिवशीही एक्स-रे काढण्यात आला, त्यात संक्रमणाची लक्षणं दिसून आली. मात्र त्यावेळी डॉक्टरांना याबाबत माहिती नव्हती.

First published: June 2, 2020, 7:54 AM IST
Tags:

ताज्या बातम्या