अवघ्या काही तासांत पृथ्वीवर धडकणार कोरोनापेक्षाही मोठं संकट, NASAनं दिली माहिती

आणखी एक संकट पृथ्वीच्या दिशेनं येत आहं. नासानं या संकटाबाबत माहिती दिली आहे.

आणखी एक संकट पृथ्वीच्या दिशेनं येत आहं. नासानं या संकटाबाबत माहिती दिली आहे.

  • Share this:
    वॉशिंग्टन, 06 जून : सारं जग सध्या कोरोनासारख्या महामारीशी दोनहात करत आहे. यातच आणखी एक संकट पृथ्वीच्या दिशेनं येत आहं. नासानं या संकटाबाबत माहिती दिली आहे. पृथ्वीच्या दिशेनं सुमारे अर्धा किलोमीटर लांबीची एक उल्का (Asteroid) येत असल्याचे नासानं सांगितलं आहे. या उल्काची गती सुमारे 5.2 किलोमीटर प्रति सेकंद असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी उल्का मानली जात आहे. ही उल्का आज भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. नासानं (NASA) दिलेल्या माहितीनुसार, ही उल्का अमेरिकेच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षा मोठी आहे. नासानं या उल्काचं नाव रॉक-163348 (2002 NN4) ठेवलं आहे. दरम्यान, नासानं ही उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असल्याचं सांगितलं आहे. या उल्काची लांबी 250 ते 570 असल्याचं सांगितले जात आहे, तर 135 मीटर रूंद आहे. नासाच्या म्हणण्यानुसार ही उल्का सूर्याजवळून जात असून पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करत आहे. दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची सोशल मीडियात चर्चा; पण हे आधी वाचा याआधी सेंटर फॉर नेर-अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजनुसार 21 मे रोजी 1.5 किमी मोठी उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून गेली होती. अशा 2000 उल्का असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या नासाच्या वतीनं या उल्कांचा अभ्यास केला जात आहे. नॅशनल नॉर्थ-अर्थ ऑब्जेक्ट स्ट्रॅटेजी डिपार्टमेंटच्या मते, एक किलोमीटरपेक्षा जास्त मोठी उल्का जर पृथ्वीच्या कक्षेत शिरली तर चेतावणी दिली जाते. जर कोणतीही मोठी उल्का या पृथ्वीवर आदळेल तर विनाशाचा नाश होऊ शकतो. यामुळे भूकंप, त्सुनामी आणि इतर अनेक आपत्ती येऊ शकतात. उल्कापासून धोका नाही नासाच्या मते, ही उल्का पृथ्वीवर आदळण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र ही आतापर्यंतची सर्वात मोठी उल्का असून, पृथ्वीच्या अगजी जवळून जाणार आहे. नासाच्या मते, कधीकधी गुरुत्वाकर्षणामुळे अशा उल्का शेवटच्या क्षणी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. दरम्यान ही उल्का 07 जून रोजी रविवारी सकाळी 8:20 वाजता निघून जाईल. पृथ्वीच्या इतक्या जवळपासून इतका मोठा उल्का पिंड 2024 मध्येच या पुढे जाईल. अम्फान आणि निसर्गनंतर आणखी एका चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून अलर्ट
    First published: