अम्फान आणि निसर्गनंतर आणखी एका चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून अलर्ट

अम्फान आणि निसर्गनंतर आणखी एका चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून अलर्ट

बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. हे कमी दाबाचं कधीही वादळाचं स्वरूप घेऊ शकतं अशी भीती हवामान खात्याकडून वर्तवण्य़ात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 जून : भारतावर आधीच कोरोनाचं संकट आहे. अशात अम्फान आणि निसर्ग चक्रीवादळाने शहरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या सगळ्यात आता आणखी एका वादळाचा (Cyclone) धोका असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. हे कमी दाबाचं कधीही वादळाचं स्वरूप घेऊ शकतं अशी भीती हवामान खात्याकडून वर्तवण्य़ात आली आहे. त्यामुळे यावर पुढचे 4-5 दिवस हवामान खात्याची (IMD) नजर असणार असून त्यानुसार अलर्ट देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

चक्रीवादळात रुपांतर होण्याचा धोका

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होणं म्हणजे हा एखाद्या वादळाचा पहिला टप्पा असतो. जरी या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर नाही झालं तरी किनाऱ्यालगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. अशात 10 जूनच्या आसपास ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यात हे कमी दाबाचं क्षेत्र ओडिशाच्या दिशेनं जाऊ शकतं. कमी दाबाचा पट्टा तयार होणं हा चक्रीवादळाचा एक प्रकार असून तो पहिला टप्पा आहे. त्यामुळे त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत अशी माहिती त्यांनी वृत्तसंस्था पीटीआयला दिली.

ना साडी ना श्रृंगार, कर्तव्याचं लेणं घेऊन महिला पोलीस अधिकाऱ्यांची वटपौर्णिमा

एका महिन्यात 2 चक्रीवादळं

मागच्या एका महिन्यातच देशात दोन चक्रीवादं आली. गेल्या महिन्यात बंगाल आणि ओडिशामध्ये पहिलं वादळ आलं. भारताच्या या शतकाचं हे पहिलं सुपर चक्रीवादळ होतं. त्यानंतर वाऱ्याचा वेग कमी झालेला पहायला मिळाला. पण या वादळामुळे बंगाल आणि ओडिशाचं मोठं नुकसान झालं. बंगालमध्ये किमान 80 लोकांचा मृत्यू झाला. या वादळाच्या धक्क्यातून लोक कुठे सावरतात तोच अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आणि निसर्ग चक्रीवादळाने कहर केला. या चक्रीवादळा वेळी वाऱ्याचा वेग 120-130 किमी / तास होता. यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

पुण्यातल्या 'मर्दानी'ने केली मोठी कारवाई, अवैध गांजा विकणाऱ्यांमध्ये खळबळ

कमी दाबामुळे मान्सूनला फायदा

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ फिरण्याची शक्यता असल्यानं मान्सून पुढं सरकण्यास मदत होईल. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाळ्याचा वेग वाढण्यासाठी मदत होईल. त्यामुळे मध्य आणि दक्षिण भारतात पावसाच्या हालचाली वाढण्याची अपेक्षा आहे.

चक्रीवादळानं मुंबईचं आर्थिक कंबरडं मोडलं, या शहरात झालं सव्वा कोटीचं नुकसान

संपादन - रेणुका धायबर

First published: June 6, 2020, 2:14 PM IST

ताज्या बातम्या