Home /News /videsh /

कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय; जगात या 3 देशांत अजून Vaccination सुरूच नाही झालं

कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय; जगात या 3 देशांत अजून Vaccination सुरूच नाही झालं

जगातील प्रगत देशांतील लसीकरणाचे (vaccination) आकडे नवनवे विक्रम (new records) नोंदवत असताना असे तीन देश (three countries) आहेत, जिथं अद्याप लसीकरण सुरुच झालेलं नाही.

    मुंबई, 26 ऑगस्ट : जगातील प्रगत देशांतील लसीकरणाचे (vaccination) आकडे नवनवे विक्रम (new records) नोंदवत असताना असे तीन देश (three countries) आहेत, जिथं अद्याप लसीकरण सुरुच झालेलं नाही. उत्तर कोरिया, (North Korea) बुरुंडी (Burundi) आणि इरिट्रिया (Iritriya) या तीन देशांत अद्याप एकही लस देण्यात आलेली नाही. जगभरात आतापर्यंत 500 कोटीपेक्षा अधिक लसी नागरिकांना देण्यात आल्या आहेत. मात्र या तीन देशांत अद्याप एकही लस देण्यात आलेली नाही. आतापर्यंत झालेल्या 500 कोटी लसीकरणापैकी सर्वाधिक लसी या चीनमध्ये देण्यात आल्या आहेत. त्याखोलाखाल भारतामध्ये आणि मग अमेरिकेत सर्वाधिक लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. चीनमध्ये आतापर्यंत 196 कोटी, भारतात सुमारे 58.9 कोटी तर अमेरिकेत 36.3 कोटी नागरिकांना लसी देण्यात आल्या आहेत. जगातील प्रगत आणि विकसित देशांमध्ये नागरिकांच्या संख्येपेक्षाही अधिक डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. तर गरीब देशांना मात्र अद्याप लसी उपलब्ध होत नसल्याचं चित्र आहे. दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये युएई लसीकरणाच्या बाबतीत सर्वात अग्रणी आहे. युएईमध्ये दर 100 नागरिकांमागे 179 लसी देण्यात आल्या आहेत. म्हणजेच सुमारे 79 टक्के नागरिकांच लसीकरण पूर्ण झालं आहे. तर दुसरीकडे उत्तर कोरिया, बुरुंडी आणि इरिट्रिया या देशातील एकाही नागरिकाला एकही लस टोचण्यात आलेली नाही. कमी लसीकरण झालेले देश कांगो – 0.1% तंजानिया – 0.4% नायजेरिया – 1.9% इथियोपिया – 2.0% हे वाचा - काबूलसाठी केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, लवकरच आखणार धोरण गरीब देशांकडे लसींचा तुटवडा जगातील श्रीमंत देशांकडे गरजेपेक्षा अधिक लसींचा साठा आहे. तर गरीब देशांना मात्र लस विकत घेणे परवडत नसल्याने त्यांच्यापर्यंत लसी पोहोचत नसल्याचं चित्र आहे. श्रीमंत देशांनी दान दिलेल्या लसींच्या आधारेच बहुतांश गरीब देशात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. लस निर्मितीचं पेटंटचा कायदा असल्यामुळे गरीब देशांना त्यांच्या देशात लसींची निर्मितीदेखील करता येत नाही. लसीकरणाच्या बाबतीतील ही विषमता सुन्न करणारी आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Corona vaccination, North korea

    पुढील बातम्या