काबूल, 26 ऑगस्ट: तालिबाननं (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर आता भारतीय विमान सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नियमित विमान (Flights) उड्डाणामुळे क्रू आणि प्रवासी दोघांनाही धोका असण्याची शक्यता आहे, अशी भीती सूत्रांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेने आज काबूल एटीसी (Air traffic control)सोडलं. त्यानंतर भारतातून आणखी काही विमानाचं उड्डाण करणं अवघड आहे. गुरुवारी शेवटच्या रेस्क्यूनंतर पुढील आदेश येईपर्यंत भारतीय उड्डाणे निलंबित राहतील.
उच्चस्तरीय सूत्रांनी CNN-News18 ला सांगितले की, अद्याप कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र उड्डाणांवर खूप मोठा धोका आहे. ते म्हणाले, आम्ही उड्डाणांच्या ऑपरेशनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरातील समुदायाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत.
पंजशीरमध्ये नॉर्दन आघाडीसोबत तालिबानची बैठक, दोन्ही गटांनी घेतला मोठा निर्णय
पुढे सुत्रांनी सांगितलं की, जरी आम्हाला अफगाणिस्तानकडून पाठिंबा मिळाला, तरीही आमचा पाकिस्तानवर विश्वास नाही आहे. उच्चस्तरीय निर्णय घेतल्यानंतर धोरण तयार केले जाईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशी शक्यता आहे की सरकार शेजारच्या देशांमध्ये उड्डाणे पाठवू शकते आणि लोकांनी तेथे यावं. त्यानंतर ज्यांच्याकडे वैध व्हिसा आहे, त्यांना भारतात आणले जाऊ शकते. त्यांनी सांगितलं की, धोरणानुसार भारताचे मदतकार्य जवळपास संपलं आहे.
Published by:Pooja Vichare
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.