मराठी बातम्या /बातम्या /विदेश /कोरोना लस घेणाऱ्याला मिळणार 7500 रुपये; लसीकरणासाठी इथं खास ऑफर

कोरोना लस घेणाऱ्याला मिळणार 7500 रुपये; लसीकरणासाठी इथं खास ऑफर

कोरोनाला हलक्यात घेऊ नका. कोरोना संक्रमण कोणालाही होऊ शकतो. कोरोना पासून वाचण्यासाठी सगळे नियम पाळा. आता सरकारने 18 वर्षांवरील मुलांसाठी लसीकरणाला परवानगी दिली आहे. पण लहान मुलांसाठी अद्याप व्हॅक्सिनेशन उपलब्ध नाही.

कोरोनाला हलक्यात घेऊ नका. कोरोना संक्रमण कोणालाही होऊ शकतो. कोरोना पासून वाचण्यासाठी सगळे नियम पाळा. आता सरकारने 18 वर्षांवरील मुलांसाठी लसीकरणाला परवानगी दिली आहे. पण लहान मुलांसाठी अद्याप व्हॅक्सिनेशन उपलब्ध नाही.

अमेरिकेतच नाही, तर सगळ्या जगात लस नको म्हणणारे हजारो जण आहेत. सरकारकडून मोफत मिळणारी लस घ्यायलाही लोक तयार नाहीत. लस घेतल्यानंतर दोन किलो टोमॅटो, आईस्क्रीम मिळेल अशा योजना सरकारला राबवाव्या लागत आहेत.

  वॉशिंग्टन, 29 एप्रिल : अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया राज्याचे गव्हर्नर जिम जस्टिस यांनी जनतेला आव्हान केलं आहे. 'जगभर पसरलेल्या महाभयंकर कोरोना विषाणू महामारीला रोखणं किती महत्त्वाचं आहे हे कदाचित तुमच्या आता लक्षात येत नसेल. पण जर तुम्ही लस घेतलीत, तर आपण लवकरात लवकर या महामारीवर विजय मिळवू शकू त्यामुळे कृपया लस घ्या,’असं ते म्हणाले.

  जगभर लक्षावधी जणांचा बळी घेणाऱ्या कोविड-19 महामारीपासून वाचण्यासाठी लस तयार करण्यात आली. विक्रमी काळात तयार झालेली ही लस आता सगळीकडे पोहोचली पण आहे. आता नवं संकट उद्भवलंय, की लोकांना ती घ्यायचीच नाही. अमेरिकेतच नाही, तर सगळ्या जगात लस नको म्हणणारे हजारो जण आहेत. सरकारकडून मोफत मिळणारी लस घ्यायलाही लोक तयार नाहीत. लस घेतल्यानंतर दोन किलो टोमॅटो, आईस्क्रीम मिळेल अशा योजना सरकारला राबवाव्या लागत आहेत.

  अमेरिकेतही हीच परिस्थिती असल्याने, शेवटी वेस्ट व्हर्जिनियाच्या गव्हर्नरनी तरुणाईने (16 ते 35 वयोगट) लस घ्यावी म्हणून त्यांना लस घेतल्यावर 100 डॉलर म्हणजे 7500 रुपयांचा सेव्हिंग बाँड देण्याचं 26 एप्रिलला जाहीर केलं आहे. यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गव्हर्नर जस्टिस म्हणाले,‘या वर्षाच्या सुरुवातीला आमचं राज्य अमेरिकेत सर्वाधिक लसीकरण करणारं राज्य होतं. गेल्या काही आठवड्यांपासून मात्र हा वेग प्रचंड मंदावला आहे. आमच्या 1.5 मिलियन लोकसंख्येपैकी लस घेण्यास पात्र असलेल्यातील 50 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. पण पात्र असलेल्या जनतेत 40 टक्के तरुण आहेत आणि त्यांना या लसीकरणाचं गांभीर्य लक्षात येत नाही. त्यामुळे आम्हाला अशी प्रोत्साहन योजना काढावी लागत आहे.’

  (वाचा - संसर्ग होतोच मग मी कोरोना लस का घ्यावी? संशोधकांनी सांगितला मोठा फायदा)

  बीबीसीच्या वृत्तानुसार जस्टीस पुढे म्हणाले, ‘जर आम्ही 70 टक्के लसीकरण करू शकलो, तर आम्ही विषाणूला रोखू शकू मग हॉस्पिटलायझेशन कमी होईल आणि मृत्युदर घटेल. राज्याच्या केअर्स कायद्याला अनुसरून लस घेणाऱ्या व्यक्तीला 100 डॉलर अधिक व्याज दिलं जाईल आणि ही रक्कम सेव्हिंग बाँड्ससाठीच वापरली जाईल याकडेही आम्ही लक्ष देऊ.’

  (वाचा - कोरोनातील अनोखा लग्नसोहळा; वाजत-गाजत नाही, एका वऱ्हाड्यासोबत वरात नवरीच्या दारात)

  गेल्या महिन्यात अमेरिकेत एका कायद्याअंतर्गत कोरोना विषाणू मदतीसाठी 1.9 ट्रिलियन डॉलरचं पॅकेज जाहीर करण्यात आलं. त्याअंतर्गत ही केअर अ‍ॅक्टमधील मदत येते. गेल्या महिन्यात कैसर फॅमिली फाउंडेशनच्या वतीने एक सर्वेक्षण करण्यात आलं त्यात लक्षात आलं, की 18 ते 29 वयोगटातील 25 टक्के नागरिकांना लसीचे इतरांवर काय परिणाम होतात हे जाणून घ्यायचंय मग ते लस घेतील. अशीच इच्छा असलेले 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले केवळ 7 टक्के नागरिक आहेत. त्यामुळे ज्येष्ठांपेक्षा अमेरिकेतील तरुणाईच्या मनात लसीबाबत अनेक शंका आहेत हेच या सर्वेक्षणातून सिद्ध झालं आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी, याचं आमिष देण्यासाठी सरकारला पैसे वाटावे लागत आहेत तरीही तरुणाई लसीकरणास तयार नाही.

  First published:

  Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus