वॉशिंग्टन, 29 एप्रिल : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गामुळे जगभरात सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. नवे रुग्ण सापडण्याच्या प्रमाणात तसंच मृत्यू होण्याच्या संख्येतही फारशी घट होताना दिसत नाही. दरम्यानच्या काळात लसीकरणही (Corona vaccination) वेगाने सुरू आहे. लसीकरण (Covid 19 vaccination) हाच सध्या तरी यावर मात करण्याचा उपाय आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग झालाच, तर हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागण्याची शक्यता कमी होते आणि मृत्यूचा धोका घटतो, असा दावा वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका संशोधनात करण्यात आला आहे.
कोरोना महासाथीदरम्यान अमेरिकेत फायझर (Pfizer) आणि मॉडर्ना (Moderna) कंपनीच्या लशी लसीकरणासाठी वापरल्या जात आहेत. वृद्धांना कोरोना झाल्यास त्यांचं हॉस्पिटलायझेशन रोखण्यासाठी लशी प्रभावी ठरत आहेत, असा दावा फेडरल स्टडीमध्ये करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या 'सेंटर फॉर डिसीज कंट्रोलअँड प्रिव्हेंशन'ने (US-CDC) सांगितलं,की यात काहीही आश्चर्य नाही. मात्र या लशींचा अपेक्षित परिणाम साध्य होत असल्याचं पाहून आश्वस्त व्हायला होतं. या दोन्हीही लशी कोविडमुळे निर्माण होणारा गंभीर आजारावर निर्बंध आणण्यसा मदत करतात. लशीचे दोन्ही डोस घेऊन झालेल्या 65 वर्षांवरच्या व्यक्तींना कोरोना संसर्ग (Corona Patient) झाल्यास त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं (Hospitalization) लागण्याची शक्यता लस न घेतलेल्या व्यक्तींच्या तुलनेत 94टक्के कमी होती. ज्यांनी लशीचा एक डोस घेतला आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागण्याची शक्यता एकही डोस न घेतलेल्यांच्या तुलनेत 64टक्के कमी असल्याचं अभ्यासात दिसून आलं.
हे वाचा - तज्ज्ञांनी केलं Alert! तातडीने लस घ्या; अन्यथा नव्या व्हेरियंटचा धोका वाढणार
आजारपण गंभीर होण्याचा धोका वाढत्या वयानुसार वाढत जातो. वृद्धांमध्ये कोविड गंभीर रूप धारण करण्याची शक्यता अधिक असल्यामुळे त्यांना लसीकरणात प्राधान्य दिलं जात आहे.
ब्रिटनमधला अभ्यास काय सांगतो?
ब्रिटनमधल्या पब्लिक हेल्थ इंग्लंड (PHE) या संस्थेने नव्याने केलेल्या अभ्यासातल्या निष्कर्षांनुसार, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका (Oxford-Astrazeneca) किंवा फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) यांच्या लशींचा एक डोस घेतला तरी कोविड-19च्या संसर्गाचा दर निम्म्याने कमी होतो. तिथल्या राष्ट्रीय आरोग्य सेवेअंतर्गत सध्या लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. ज्या लोकांना लशीचा एक डोस घेतल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत संसर्ग झाला होता, त्यांच्याकडून लस न घेतलेल्या व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता 38 ते 49 टक्क्यांनी कमी झाल्याचं आढळून आलं.
'पीएचई'ने असंही सांगितलं की, लसीकरणानंतर 14 दिवसांनी कोविड-19 पासून (Covid19) सुरक्षितता मिळत असल्याचं आढळून आलं. तसंच सर्व वयोगट आणि संपर्कांमुळेही यात काही फरक दिसून आला नाही. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितलं, 'लशीचा एक डोस घरात संसर्गाची शक्यता 50टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो. यावरून हे पुन्हा सिद्ध होतं की, लस तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सुरक्षा प्रदान करते. लसीकरणाची तुमची वेळ येईल, तेव्हा जरूर लस घ्यावी.'
हे वाचा - Alert: RT-PCR चाचणी निगेटिव्ह, तरीही कोरोनाची लक्षणं दिसतायत? काय करायचं?
या नव्या निष्कर्षांची तज्ज्ञांकडून अद्याप पूर्ण पडताळणी झालेली नाही. या अभ्यासात 24 हजार घरांमधल्या 57हजारांहून अधिक व्यक्तींशी संपर्क साधण्यात आला. कोविड-19 चा संसर्ग प्रयोगशाळेतून सिद्ध झालेला किमान एक रुग्ण असेल आणि ज्याला लशीचा किमान एक डोस देण्यात आला असेल, अशा व्यक्तींचा यात अभ्यास करण्यात आला. या लोकांची तुलना लस न घेतलेल्या 10 लाख लोकांशी करण्यात आली.
घरात लस घेतलेल्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर दोन ते 14 दिवसांत त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कोणा व्यक्तीला कोरोनासंसर्ग झाल्यास त्याची वर्गवारी 'सेकंडरी' रुग्ण म्हणून करण्यात आली. या सर्वेक्षणात बहुतांशी 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींची निरीक्षणं नोंदवण्यात आली. याआधीच्या अभ्यासात असं आढळून आलं होतं, लशीचा एक डोस घेतल्यानंतर चार आठवड्यांनी संसर्ग होण्याचा धोका 60 ते 65 टक्क्यांनी कमी होतो.
हे वाचा - Covishield आणखी स्वस्त; Serum institute ने जारी केली कोरोना लशीची नवी किंमत
'पीएचई'मधल्या लसीकरण विभागाच्या प्रमुख डॉ. मेरी रॅमसे सांगतात, 'सर्वसामान्य जीवन पुन्हा जगण्याच्या दृष्टीने लसीकरण महत्त्वाचं आहे. आजाराची तीव्रता तर त्यामुळे कमी होतेच, पण अनेकांचे जीवही वाचतील. आता असं आढळतं आहे,की लस घेतलेल्या व्यक्तींपासून दुसऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोकाही कमी होत आहे.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.