मराठी बातम्या /बातम्या /विदेश /या गुढ बीचवर जाण्यास आजही घ्यावी लागते परवानगी, एकेकाळी होता धोकादायक

या गुढ बीचवर जाण्यास आजही घ्यावी लागते परवानगी, एकेकाळी होता धोकादायक

जगात आजही अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याभोवती रहस्यांचं जाळं विणलेलं आहे.

जगात आजही अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याभोवती रहस्यांचं जाळं विणलेलं आहे.

जगात आजही अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याभोवती रहस्यांचं जाळं विणलेलं आहे.

ब्रासिलिया, 11 जून : जगभरातील विविध आयलँड्स अर्थात बेटं आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जातात. जगभरातील पर्यटक या बेटांवर येऊन वेळ घालवतात. मात्र जगात एक बेट असंही आहे जे चहूबाजूंनी नैसर्गिक सौंदर्यानं वेढलेलं आहे मात्र तिथं एक भीतीदायक गोष्टही आहे. (brazil news)

या बेटाबाबतची भीतीदायक गोष्ट म्हणजे कधीकाळी त्याचा वापर एका विशिष्ट गोष्टीसाठी केला जायचा. ही गोष्ट म्हणजे या बेटावर कधीकाळी अनेक धोकादायक गुन्हेगार कैद करून ठेवले जायचे. (fernando de noronha beach)

ब्राझीलच्या फर्नांडो डी नोरेन्हा या बीचबाबतची सत्यकथा आहे. या बेटांच्या समूहावर एकेकाळी खूप धोकायदायक गुन्हेगारांना कैद करून ठेवलं जात असे. सुंदर आणि हिरव्यागार जंगलांनी व डोंगररांगांनी वेढलेल्या या बेटांच्या समूहाचा हा इतिहास आहे. या बेटांच्या समूहाच्या आसपास 20 लहानमोठी बेटं आहेत. (fernando de noronha once used as jail)

हेही वाचा हडप्पा संस्कृतीपासून मल्टिग्रेन लाडूंचा इतिहास; उत्खननादरम्यान सापडले पुरावे

या बेटावर जाण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते. या बेटावर एकावेळी एका वेळी केवळ 420 पर्यटकांनाच जाण्याची परवानगी मिळते. फर्नांडो डी नोरेन्हा हे बेट 28.5 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं आहे. पोर्तुगालचे समुद्री प्रवासी फर्नांडो डी नोरेन्हा यांनी हे बेट शोधून काढलं होतं. (brazil beach which was once a jail)

यानंतर डच आणि पोर्तुगाल अशा दोन्ही देशांचं सैन्य याचा वापर करत असे. मात्र नंतर याचं रूपांतर तुरुंगात करण्यात आलं. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत इथल्या मुख्य बेटाचा वापर कैदखान्यासारखा होत असे.

हेही वाचा 'मदत करावी तर अशी'; तामिळनाडूतील पोलिसाने घडवलं माणुसकीचं दर्शन

ब्राझीलच्या मोठमोठ्या गुन्हेगारांना शिक्षा भोगायला लावताना या बेटाचा वापर होत असे. या गुन्हेगारांना या बेटावर पाठवलं जात असे. हा तुरुंग 1957 मध्ये बंद करण्यात आला. मात्र काही कैदी तिथून कधीच परत आले नाहीत. त्यांनी या बेटालाच आपलं घर बनवलं. आजही या बेटावर तुरुंगाचे अवशेष दिसतात. ही सध्या युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साइट आहे. ब्राझीलच्या किनाऱ्यापासून दूर असलेलं हे एकमेव बेट आहे जिथं लोक राहतात.

First published:
top videos

    Tags: Crime, Prisoners