टोकियो, 30 जानेवारी: जपानमध्ये (Japan) अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्या फक्त त्याच देशात आढळतात. यामध्ये महत्त्वाच्या अन्य गोष्टींसह शिस्तीचाही समावेश आहे. जगातला कोणताही देश शिस्तपालनात (Discipline in Japan) जपानशी स्पर्धा धरू शकत नाही. जपानमध्ये अशा अनेक यंत्रणा आहेत, की ज्या जगभरातल्या नागरिकांना आश्चर्यचकित करतात. त्यापैकीच एक म्हणजे लॉस्ट अँड फाउंड सिस्टीम (Lost And Found System) होय. जगातली बहुतेक ठिकाणं अशी आहेत, की जिथे कुणाची पर्स किंवा फोन हरवला किंवा कुठेतरी पडला तर या वस्तू सापडण्याची शक्यता खूप कमी असते. जपानमध्ये चोरीचे प्रकार तर दूरच, पण कोणतीही वस्तू हरवली तरी ती सापडण्याची शक्यता खूप जास्त असते. जपानमध्ये देखील टॅक्सीत फोन विसरणं, ट्रेनच्या सीटखाली ब्रीफकेस किंवा नोटांनी भरलेली पर्स विसरणं, अशा गोष्टी सर्रास पाहायला मिळतात. दर वर्षी 12.6 कोटी जपानी नागरिकांच्या कोणत्या ना कोणत्या वस्तू हरवतात. परंतु, त्यातल्या बहुतांश गोष्टी संबंधित मालकाला परत मिळतात. यासाठी जपानमधली यंत्रणा विशेष परिश्रम घेते. यासाठी पायाभूत सुविधा, कायदेशीर प्रोत्साहन आणि सांस्कृतिक मानकं आदी बाबी त्यांना महत्त्वाच्या ठरतात. हे वाचा- त्या भारतीयाला पाकने दिला व्हिसा, फाळणीवेळी ताटातूट पण 74 वर्षांनी झाली होती भेट जपानची ही संपूर्ण यंत्रणा इतक्या प्रभावीपणे काम करते, की या यंत्रणेचं काम पाहून अनेक गुंतागुंतीच्या प्रणाली तयार करणारे पाश्चात्य निरीक्षकही थक्क होतात. ही प्रक्रिया स्थानिक कोबानपासून (Koban) सुरू होते. हे कोबान म्हणजे एखाद्या पोलिस केबिनप्रमाणे एक किंवा दोन खोल्यांचं छोटं घर असतं. कायद्याची अंमलबजावणी ही जपानची सामुदायिक प्रवृत्ती असल्याने कोबान यशस्वी झाल्याचं दिसतं. संपूर्ण जपानमध्ये 6300 कोबान आहेत. नागरिकांना गरजेवेळी सहजपणे पोलिसांशी संपर्क साधता यावा, या दृष्टीने कोबानची व्यवस्था करण्यात आली आहे.
जपानच्या राजधानीचं शहर असलेल्या टोकियोसारख्या (Tokyo) गजबजलेल्या महानगरात 2018मध्ये हरवलेल्या 41 लाख वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या होत्या. अशा प्रकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या काही वर्षांत तीन चतुर्थांश प्रकरणांमधल्या नागरिकांना त्यांच्या हरवलेल्या वस्तू परत मिळाल्याचं नोंदींवरून स्पष्ट होते. टोकियोतले अधिकारी हरवलेली वस्तू आणि आणणाऱ्याची माहिती कोबानमधल्या त्यांच्या अहवालात नोंदवतात. सापडलेल्या वस्तू टोकियो मेट्रोपॉलिटन पोलिस (Tokyo Metropolitan Police) विभागाकडे पाठवल्या जातात आणि तिथल्या लॉस्ट अँड फाउंड सेंटरमध्ये त्या ठेवल्या जातात. हे वाचा- ..म्हणून लोकांनी रातोरात रिकामं केलं हे शहर; 100 वर्षांनंतर अशी झालीये अवस्था जपानमध्ये सापडलेली वस्तू सेंटरमध्ये पोहोचली, की मालकाबाबत माहिती मिळवण्यासाठी त्या वस्तूची पडताळणी केली जाते. सेंटरच्या लॉस्ट अँड फाउंड वेबसाइटवरदेखील नागरिक त्यांच्या हरवलेल्या वस्तू शोधू शकतात. या वेबसाइटवर हरवलेल्या वस्तूंची यादी असते. तीन महिन्यांत त्या वस्तूचा हक्काचा मालक सापडला नाही तर ती वस्तू ज्या व्यक्तीला सापडली त्याला देण्यात येते किंवा महापालिका शासनाकडे देण्यात येते.
जपानमधल्या रेल्वे स्थानकांवर (Railway Stations) नेहमीच प्रचंड गर्दी असते. या रेल्वे स्थानकांवरही हरवलेल्या वस्तू देण्यासाठी विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. 2018 मध्ये रेल्वे स्थानकांवर सापडलेल्या सुमारे 31 टक्के वस्तू परत करण्यात आल्या. तसंच तिथे सापडलेल्या छत्र्यांपैकी केवळ एक टक्काच छत्र्या परत करण्यात आल्याचं नोंदींवरून स्पष्ट होतं. या व्यवस्थेत जपानी संस्कृतीचाही (Culture) मोठा वाटा आहे. तिथल्या मुलांना याबाबत नैतिक शिक्षण दिलं जातं. मुलांनी काही हरवलेल्या वस्तू पोलिसांना दिल्यास पोलिस त्याला ओझं मानत नाहीत, अशा आशयाची पोस्टर्स लावून तिथले पोलिस पालकांना आवाहन करतात. देशात हरवलेल्या वस्तू परत करण्याची संस्कृती टिकवून ठेवण्यात जपानच्या मालमत्ता कायद्याची (Property Act) भूमिकाही महत्त्वाची आहे. 2007 मध्ये कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर हरवलेली वस्तू मूळ मालकाकडे, पोलिसांकडे किंवा लॉस्ट अँड फाउंड सेंटरशी संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हे वाचा- धक्कादायक! मसाज पार्लरमध्ये गेलेला 70 वर्षीय वृद्ध; तरुणीने हात लावताच मृत्यू हे मॉडेल इतर देशांमध्ये लागू केलं जाऊ शकतं की नाही, याचं उत्तर देणं कठीण आहे. कारण ते लागू करणं सोपं नाही. यामध्ये संस्कृती आणि नैतिक पैलूंची भूमिका महत्त्वाची असून, त्याशिवाय याची कठोर अंमलबजावणी होऊ शकत नाही.