हजारो नागरिकांना इमोशनल करणारा हा व्हिडीओ उच्चपदस्थ पाकिस्तानी अधिकाऱ्यांपर्यंतसुद्धा पोहचला. शुक्रवारी, नवी दिल्ली स्थित पाकिस्तानी उच्चायुक्तालयानं (Pakistan High Commission) सिका खान यांचा व्हिसा मंजूर केला आहे. जेणेकरून ते आता आपल्या भावाला आणि कुटुंबातील इतर सदस्यांना भेटण्यासाठी पाकिस्तानला जाऊ शकतील. याबाबत पाकिस्तानी उच्चायुक्तांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'नोव्हेंबर 2019 मध्ये पाकिस्तानच्या बाजूनं उघडलेला व्हिसा-मुक्त कर्तारपूर साहिब कॉरिडॉर दोन्ही देशांतील लोकांना एकमेकांच्या जवळ आणत आहे, ही बाब दोन्ही भावांच्या गोष्टींतून सिद्ध झाली आहे'. सिका खान यांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयाचे प्रभारी आफताब हसन खान (Aftab Hassan Khan) आणि उच्चायुक्तालयातील इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभारही मानले. हे वाचा-Pakistan Terrorist Attack: बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 10 सैनिकांचा मृत्यू; एक दहशतवादी ठार नासीर धिल्लन आणि लव्हली सिंग हे दोन पाकिस्तानी तरुण 'पंजाबी लहर' हे युट्युब चॅनल चालवतात. फाळणीच्या वेळी विभक्त झालेल्या दोन्ही देशांतील पंजाब भागातील कुटुंबांच्या कथा समोर आणण्यावर या चॅनलचा भर आहे. फाळणीच्या वेळी या भागातील सुमारे 12 दशलक्ष लोक स्थलांतरित झाले होते. ज्यामध्ये 65 लाखांहून अधिक लोक भारतातून आणि सुमारे 50 लाख लोक पाकिस्तानच्या बाजूनं स्थलांतरित झाले होते. 2019 मध्ये नासीर आणि लव्हली कामानिमित्त पाकिस्तानमधील फैसलाबादजवळच्या बोहरान गावामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांना सिका खान व त्यांच्या भावाबद्दल माहिती मिळाली होती.Kartarpur Sahib corridor has reunited two elderly brothers across the Punjab border after 74 years. The two brothers had parted ways at the time of partition. A corridor of reunion 🙏 pic.twitter.com/g2FgQco6wG
— Gagandeep Singh (@Gagan4344) January 12, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.