मराठी बातम्या /बातम्या /विदेश /विचित्र! फक्त पैसे उधळण्यासाठी उभं राहिलं थिएटर, कधीच लागला नाही सिनेमा

विचित्र! फक्त पैसे उधळण्यासाठी उभं राहिलं थिएटर, कधीच लागला नाही सिनेमा

एका श्रीमंत माणसानं केवळ (Theater built only for hobby never played in film) छंद म्हणून अख्खं थिएटर बांधलं, पण प्रत्यक्षात तिथं एकही चित्रपट लागला नाही.

एका श्रीमंत माणसानं केवळ (Theater built only for hobby never played in film) छंद म्हणून अख्खं थिएटर बांधलं, पण प्रत्यक्षात तिथं एकही चित्रपट लागला नाही.

एका श्रीमंत माणसानं केवळ (Theater built only for hobby never played in film) छंद म्हणून अख्खं थिएटर बांधलं, पण प्रत्यक्षात तिथं एकही चित्रपट लागला नाही.

कैरो, 20 ऑक्टोबर : एका श्रीमंत माणसानं केवळ (Theater built only for hobby never played in film) छंद म्हणून अख्खं थिएटर बांधलं, पण प्रत्यक्षात तिथं एकही चित्रपट लागला नाही. ही थिएटर आहे इजिप्तमध्ये. काही वर्षांपूर्वी इथं (Tourist wanted to see film in open theater) आलेल्या एका पर्यटकाला ओपन थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याची इच्छा निर्माण झाली. बस्स. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने (French tourist made open theater) स्वतःच्या खिशातील करोडो रुपये खर्च केले आणि हे ओपन थिएटर उभं केलं.

असं तयार झालं थिएटर

इजिप्तमधील सिनाई भागातील एका वाळवंटी प्रदेशात एक ओपन थिएटर आहे. हा दुर्गम आणि वाळवंटी प्रदेश असून इथली लोकवस्ती मर्यादित आहे. काही वर्षांपूर्वी एक फ्रेंच पर्यटक इजिप्तमध्ये पर्यटनासाठी आला होता. त्याला फ्रेंचमध्ये ओपन थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याचा छंद होता. त्यासाठी आवश्यक असणारं जुजबी साहित्यदेखील त्याने जमवलं होतं. मात्र इजिप्तमध्ये थिएटर नसल्यामुळे त्याला सिनेमा पाहण्याची इच्छा गुंडाळून ठेवावी लागत होती.

थिएटर उभारण्याचा निर्णय

एक दिवस त्याने सिनाई भागात थिएटर उभारण्याचा निर्णय घेतला. काही स्थानिक माणसांना हाताशी घेऊन त्यानं थिएटरचं बांधकाम सुरू केलं. काही दिवसांतच हे थिएटर तयार झालं. तिथं पडदा बसवण्यात आला, शेकडो खुर्च्या लावण्यात आल्या, जनरेटर लावण्यात आलं. सगळी तयारी झाली होती. त्या रात्री फ्रेंच पर्यटकासह अनेकजण सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र सिनाईतील स्थानिकांनी या कल्पनेला विरोध केला. स्थानिकांनी सिनेमाविषयी असलेल्या गैरसमजातून थिएटरचा जनरेटरच जाळून टाकला. त्यामुळे त्या रात्री तिथे सिनेमा चालू शकला नाही.

हे वाचा- लोकप्रिय कलाकारानं सोन्याचे तांदूळ सोडले नदीत, एका संदेशासाठी केला लाखोंचा खर्च

थिएटर ओस

त्यानंतर या थिएटरमध्ये कधीच कुठलाही सिनेमा चालू शकला नाही. आता हे थिएटर केवळ पर्यटकांच्या भेटीसाठीचं ठिकाण बनलं आहे. वर्षानुवर्षं इथं धूळ आणि माती बसून खुर्च्या गंजल्या आहेत. या जागेची नीट देखभालही केली जात नाही. मात्र एखादा व्यक्ती आपल्या हौसेसाठी काय करू शकतो, याची प्रचिती या थिएटरमधून आली आहे.

First published:
top videos

    Tags: History