मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

लोकप्रिय कलाकारानं सोन्याचे तांदूळ सोडले नदीत, एका संदेशासाठी केला लाखोंचा खर्च

लोकप्रिय कलाकारानं सोन्याचे तांदूळ सोडले नदीत, एका संदेशासाठी केला लाखोंचा खर्च

एका लोकप्रिय आर्टिस्टनं लाखो रुपयांचे सोन्याचे तांदूळ नदीत सोडून दिल्याची घटना (An artist throws golden grains into river) नुकतीच समोर आली आहे.

  • Published by:  desk news

बिजिंग, 19 ऑक्टोबर : एका लोकप्रिय आर्टिस्टनं लाखो रुपयांचे सोन्याचे तांदूळ नदीत सोडून दिल्याची घटना (An artist throws golden grains into river) नुकतीच समोर आली आहे. सोनाराला लाखो रुपये देऊन त्याने सोन्याचे (Golden rice worth lakhs of rupees) तांदूळ बनवून घेतले. त्यानंतर हे सगळे तांदूळ नदीत सोडले. अन्नाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठीच आपण हा उपक्रम केल्याचं त्यानं म्हटलं आहे.

आहे हा उद्देश

चीनमधील प्रसिद्ध आर्टिस्ट यैंग यॅक्सिन (Yang Yexin) यांनी लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे तांदूळ नदीत सोडून दिले. लोकांना अन्नाचं मूल्य समजावं, यासाठी त्यांनी हा उपक्रम केला. अनेकजण अन्न वाया घालवतात. अन्न फेकून देतात किंवा गरजेपेक्षा जास्त अन्न शिजवतात. अन्न हे सोन्याइतकंच मौल्यवान असून त्याच्या प्रत्येक कणाला किंमत असल्याचा संदेश देण्यासाठीच सोन्याचे तांदूळ नदीत सोडण्यात आले.

सोन्यापेक्षा अन्न महत्त्वाचं

सोन्याला जगात किंमत आहेच, मात्र सोन्याच्या प्रत्येक कणापेक्षाही धान्याचा कण अधिक महत्त्वाचा असल्याचं यँग यॅक्सिन यांनी म्हटलं आहे. हा संदेश देण्यासाठी त्यांनी 500 ग्रॅम सोन्याचे तांदूळ खरेदी केले. बाजारभावानुसार याची किंमत आहे 23 लाख रुपये. अन्नाची बरबादी रोखण्यासाठी हे पाऊल अत्यावश्यकच होतं, असा संदेश यँग यांनी दिला आहे. सोन्याला अन्नाच्या तुलनेत काहीही महत्त्व नसून ते सहजपणे नदीत फेकून दिले जाऊ शकतात, असा विचार त्यांनी व्यक्त केला आहे.

हे वाचा- पुतिन यांची मुलाखत घेताना महिला अँकरने केलं विचित्र कृत्य; देशभरात गोंधळ

सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा

यँग यांनी प्रसिद्धीसाठीच हे पाऊल उचलल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. सोन्याचे तांदूळ नदीत फेकणं हा केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. वँग यांना संदेशच द्यायचा होता, तर साधे तांदूळ वापरूनही तो देता आला असता, असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तर काही नेटकरी मात्र या उपक्रमावर खूश असून वँग यांचं ते कौतुक करत आहेत.

First published:

Tags: China, Food