मराठी बातम्या /बातम्या /विदेश /बारमध्ये महिलांनी एकमेकींना किस केलं म्हणून भयंकर शिक्षा; बाऊन्सरने दोघींना जमिनीवर आपटलं, लाथेने मारहाण

बारमध्ये महिलांनी एकमेकींना किस केलं म्हणून भयंकर शिक्षा; बाऊन्सरने दोघींना जमिनीवर आपटलं, लाथेने मारहाण

लेस्बिअन महिलेने बारमधील आपला हा भयावह अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे.

लेस्बिअन महिलेने बारमधील आपला हा भयावह अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे.

लेस्बिअन महिलेने बारमधील आपला हा भयावह अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे.

वॅलेट्टा, 03 ऑगस्ट : सामान्यपणे महिलांना पुरुषांचं आणि पुरुषांना महिलांचं आकर्षण असतं. पण काही पुरुषांना पुरुषांचंच आणि काही महिलांना महिलांचंच आकर्षण असतं. हे लोक एलजीबीटीक्यू समुदायात येतात. अशाच दोन महिला रात्री बारमध्ये (lesbian girl couple kissing in bar) गेल्या. तिथं त्या एकमेकींना किस करत होत्या. पण तिथं त्यांना त्याची भयंकर शिक्षा मिळाली (Bouncer attacked lesbian girl couple in bar).

नाइटक्लबमध्ये जाऊन एकमेकींना किस करणाऱ्या या महिलांना बाऊन्सरने जमिनीवर आपटलं आणि लाथेने मारहाण केली आहे. माल्टातील (Malta) नॉर्डिक बारमधील (Nordic bar) ही धक्कादायक घटना आहे. या लेस्बियन कपलने बारमधील आपला हा भयावह अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे. एमजीआरएम म्हणजे माल्टा गे राइट्स मुव्हमेंट फेसबुक पेजवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

सेलिन बाल्जेन गेरा असं या महिलेचं नाव आहे. तिने पोस्टमध्ये सांगितल्यानुसार ती आपल्या एका मैत्रिणीसोबत जुलियनमधील नॉर्डिक बारमध्ये गेली होती. "तिथं आम्ही बसलो. मी माझ्या गर्लफ्रेंडला किस करत होते. त्यानंतर तिथं काही बाऊन्सर्स आले आणि आम्हाला बारमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला का काढलं जात आहे, ते आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही त्यांना यााबबत विचारलं तर ते अधिकच आक्रमक झाले"

हे वाचा - Tokyo Olympics : सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही तरुणी कोण?

"त्यांनी आम्हाला जमिनीवर पाडलं. आम्हाला लाथा मारल्या आणि आम्ही खाली जमिनीवरच पडून राहण्यास सांगितलं. आम्ही शांतपणे तिथे आमचा वेळ घालवत होतो आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला. मी आधीसुद्धा या बारमध्ये आली आहे. पण इतका वाईट अनुभव कधीच आला नाही", असंही तिने सांगितलं.

माल्टा डेलीच्या रिपोर्टनुसार, नॉर्डिक बारच्या मालकाने सांगितलं की या प्रकरणाचा आम्ही तपास करत आहोत. पोलिसांकडूनसुद्धा याचा तपास सुरू आहे.

हे वाचा - आश्चर्यच! चक्क कुत्र्यासारखा भुंकतो हा पक्षी; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

माल्टा गे राइट्स मुव्हमेंटच्या मते, नॉर्डिक बार किती तरी वेळा वादात सापडलं आहे. या क्षेत्रात एलजीबीटीक्यू लोकांना सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे जोपर्यंत अशा ठिकाणी एलजीबीटीक्यू लोकांना सुरक्षेची गॅरंटी मिळत नाही, तोपर्यंत तिथं जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

First published:

Tags: Crime news, Lesbian girls, Shocking news, World news