Home /News /videsh /

गर्भकळांमुळे पत्नी वेदनेने तडफडतेय आणि पठ्ठ्या खातोय McDonald चा बर्गर

गर्भकळांमुळे पत्नी वेदनेने तडफडतेय आणि पठ्ठ्या खातोय McDonald चा बर्गर

बाळाच्या जन्मानंतर काय झालं असेल याचा तुम्ही विचारही करू शकत नाही.

    ऑस्ट्रेलिया, 12 सप्टेंबर : बाळाचा जन्म (Birth Of Child) हा कोणत्याही दाम्पत्याच्या आयुष्यातील (Couple) आनंदाचे क्षण असतात. यासाठी प्रतीक्षा करावी लागते आणि यादरम्यान एकमेकांची काळजीही घ्यावी लागते. ऑस्ट्रेलियामधील (Australia) एक पुरुषाने अशा कठीण क्षणी पत्नीला सोडून बर्गर (Man Eating Burger During Labour Pain) ला प्राथमिकता दिली. या चुकीची त्याला चांगलीच शिक्षा मिळाली, आणि यापुढे McDonald जाण्यापूर्वी तो दहा वेळा तरी विचार करेल. महिलेने स्वत: आयुष्यातील हा अनुभव TikTok वर शेअर केला आहे. यावेळी तिने सांगितलं की, आयुष्यातील त्या नाजूक क्षणी पतीने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा तिला पतीची सर्वाधिक गरज होती, त्यावेळी तो बर्गर खात बसला होता. गर्भकळांनी तडफडणाऱ्या महिलेसमोर खाल्ल हॅपी मील @athome_withjaxon नावाच्या TikTok Account मधून एका व्हिडीओच्या माध्यमातून अनुभव शेअर करण्यात आला. येथे दोन ऑस्ट्रेलियन महिला बाळाच्या जन्माच्या वेळी वडिलांच्या वागणुकीबाबत बातचीत करीत होते. एका महिलेने सांगितलं की, माझे पती मुलाचा जन्म पाहू शकले नाही. कारण ते त्यावेळी माझ्यासाठी पार्किंग तिकीट घेत होते. यादरम्यान दुसऱ्या महिलेने सांगितलं की, माझे पती आधी McDonald ला गेले. परत आल्यानंतर ते माझ्यासमोर खात बसले. जेव्हा मी सिजेरियन ऑपरेशनसाठी जात होती, तेव्हा माझा नवरा बर्गर खात बसला होता. यानंतर तो वेटिंग रुममध्ये जाऊन झोपला. जेव्हा मी सी-सेक्शनमधून बाळाला जन्म दिला, तेव्हा माझे वडील सोबत होते. हे ही वाचा-बिअर मिळाली पण नोकरी गेली; दारूच्या नशेत नग्न होऊन सुपरमार्केटमध्ये पोहोचला बाळाचे वडील आता एक्स नवरा पुढे महिलेने सांगितलं की, आता ती पतीसोबत राहत नाही. तिचा नवरा मुलाच्या जन्माच्यावेळी नव्हता. आम्ही गेल्या 4 वर्षांपासून एकत्र होतो आणि आमच्या लग्नाला 14 महिने झाले होते. प्रेग्नेन्सीच्या 6 महिन्यात त्याने ठरवलं होतं की, त्याचं माझ्यावरील प्रेम कमी होत चाललं आहे आणि त्याला माझ्यासोबत राहायचं नाही. या व्हिडीओमध्ये अनेक महिन्यांनी बाळाच्या जन्माच्या वेळी पतीचा अनुभव शेअर केलं.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Australia, Viral video.

    पुढील बातम्या