Home /News /viral /

बिअर मिळाली पण नोकरी गेली; दारूच्या नशेत नग्न होऊन सुपरमार्केटमध्ये पोहोचला पोलीस अधिकारी

बिअर मिळाली पण नोकरी गेली; दारूच्या नशेत नग्न होऊन सुपरमार्केटमध्ये पोहोचला पोलीस अधिकारी

पोलीस अधिकाऱ्याची ती अवस्था पाहून अनेकांना धक्काच बसला.

    पोलंड, 11 सप्टेंबर : एका पोलीस अधिकाऱ्याला (Police Officer) दारूच्या नशेत नग्न होऊन सुपर मार्केटमध्ये (Super Market) जाणं आणि तेथे जाऊन बिअर (Beer Shopping in Super Market) खरेदी करणं भोवलं आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर आरोपी पोलीस अधिकाऱ्याला नोकरीवरुन निलंबित करण्यात आलं आहे. ही घटना पोलंड येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा पोलीस अधिकारी दारूच्या नशेन अंगावर एकही कपडे न घातला खरेदी करण्यासाठी सुपर मार्केटला गेला. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली. यानंतर त्याला नोकरीवरुनदेखील निलंबित करण्यात आलं. पोलंडमधील स्विडनिका शहरात या आरोपी अधिकाऱ्याला जेव्हा दुकानदारांनी नग्न अवस्थेत पाहिलं आणि पोलिसांना याची सूचना दिली. (The police officer reached supermarket to buy beer he was naked after getting drunk) स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, आरोपी पोलीस अधिकारीचं नाव मासीज डब्ल्यू असल्याचं सांगितलं जात आहे. ही व्यक्ती बिअरचे चार कॅन पकडून दुकानत चेक आऊट करीत बाहेरच्या दिशेने जात असल्याचं दिसलं. एका अन्य व्यक्तीने तो दारूचे पैसे देत असल्याचं पाहिलं. हे फोटो स्थानिक ऑनलाइन वृत्त संकेतस्थळ Swidnica24 यांनी शेअर केले होते. ज्यानंतर हे फोटो व्हायरल झाले. प्रत्यक्षदर्शींनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अभद्र वागणूक केल्याच्या आरोपाखाली त्या पोलिसाला अटक केलं. त्या व्यक्तीला कुटुंबीयांकडे सोपविण्यापूर्वी त्याला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मासीज त्या दिवशी सुट्टीवर होते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime, Viral photo

    पुढील बातम्या