Home /News /videsh /

अध्यक्ष ट्रम्प यांनी प्रवास केलेल्या Air Force Oneच्या केबिनमध्येही व्हायरसची बाधा, डॉक्टरांनी जारी केलं Health Bulletin

अध्यक्ष ट्रम्प यांनी प्रवास केलेल्या Air Force Oneच्या केबिनमध्येही व्हायरसची बाधा, डॉक्टरांनी जारी केलं Health Bulletin

President Donald Trump walks down the steps of Air Force One at Pittsburgh International Airport in Coraopolis, Pa., Tuesday, Aug. 13, 2019. Trump is heading to Monaca, Pa., to tour Shell's soon-to-be completed Pennsylvania Petrochemicals Complex. The facility, which critics claim will become the largest air polluter in western Pennsylvania, is being built in an area hungry for investment. (AP Photo/Susan Walsh)

President Donald Trump walks down the steps of Air Force One at Pittsburgh International Airport in Coraopolis, Pa., Tuesday, Aug. 13, 2019. Trump is heading to Monaca, Pa., to tour Shell's soon-to-be completed Pennsylvania Petrochemicals Complex. The facility, which critics claim will become the largest air polluter in western Pennsylvania, is being built in an area hungry for investment. (AP Photo/Susan Walsh)

विमानात तब्बल 4 हजार स्क्वेअरफुट जागा वापरासाठी उपलब्ध आहे. त्यात अध्यक्षांसाठी अलिशान ऑफिस, काही खोल्या आहेत. त्याचबरोबर पाहुण्यांसाठीही बसण्याची खास व्यवस्था आहे.

    वॉशिंग्टन 03 ऑक्टोबर: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. व्हाईट हाऊसमध्ये क्वारंटाइन राहिल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यासाठी ते अध्यक्षांसाठी असलेल्या Air Force One या विमानातून गेले होते. जगातल्या राष्ट्राध्यक्षांचं हे सर्वात सुरक्षीत आणि शक्तिशाली विमान समजले जाते. ट्रम्प हे कोरोनाबाधित असल्याने आणि त्यांनी विमानाने प्रवास केलेल्यामुळे एअर किंडिशनच्या माध्यमातून सर्व विमानातच व्हायरस पसरला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कॉकपिटमध्ये असलेल्या पायलट आणि इतर कर्मचारी वर्गालाही बाधा होण्याची शक्यता असल्याने आता सगळ्यांची कोविड टेस्ट होणार आहे. दरम्यान, अध्यक्षांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांचं हेल्थ बुलेटीन जारी केलं आहे. अध्यक्ष ट्रम्प हे उपचारांना अतिशय चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या सर्व चाचण्या झाल्या असून काळजीचं कुठलेही कारण नाही असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. असं आहे अध्यक्षांचं विमान Air Force One असं त्या विमानाचं नाव असून ते जगातलं सर्वात शक्तिशाली विमान असल्याचं समजलं जातं. अत्याधुनिक संपर्क यंत्रणा आणि तेवढ्याच तोडीची सुरक्षा व्यवस्था असलेलं हे विमान कायम जगभर कुतुहलाचा विषय ठरलं आहे. बोइंग 747-200बी श्रेणीचं हे विमान असून त्यावर United States Of Amecrica असं लिहिलेलं आहे. जगात कुठल्याही हवामानात उतरण्याची या विमानाची क्षमता आहे. त्याचबरोबर हवेतल्या हवेत इंधन भरण्याचीही त्याची क्षमता आहे. कुठल्याही क्षेपणास्त्राला परतवून लावण्याची व्यवस्था असून संभाव्य धोक्याची कल्पना देण्याची अत्यंत आधुनिक रडार यंत्रणाही त्यावर बसविण्यात आलीय. विमानात तब्बल 4 हजार स्क्वेअरफुट जागा वापरासाठी उपलब्ध आहे. त्यात अध्यक्षांसाठी अलिशान ऑफिस, काही खोल्या आहेत. त्याचबरोबर पाहुण्यांसाठीही बसण्याची खास व्यवस्था आहे. आणीबाणीच्या काळात याच ऑफिसचा उपयोग वॉर रुम म्हणून करण्याचीही सोय आहे. विमानात खास सर्जरी रुम असून त्यात कायम दोन डॉक्टर्स तैनात असतात. त्याचबरोबर विमानात दोन किचन्स असून त्यात प्रत्येकी 100 जणांचा स्वयंपाक तयार करता येतो. या विमानात किमान 400 जण एकाच वेळी प्रवास करू शकतात. 'ट्रम्प हे वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. पण या हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वीच त्यांना प्रायोगिक म्हणजे अजून ज्यावर प्रयोग सुरू आहेत असं औषध देण्यात आलं आहे अशीही माहिती काही माध्यमांनी दिली आहे. कोविडमुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णावर या औषधाचा चांगला परिणाम झाल्याचं प्रयोगांतून लक्षात आलं आहे. रिजनरॉन फार्मास्युटिकल्स आयएनसी या कंपनीने हे औषध तयार केलं असून ते अँटिबॉडी ड्रग आहे. ट्रम्प यांच्या डॉक्टरांनी विनंती केल्यामुळे अनुकंपा तत्त्वावर आम्ही या औषधाचा एक डोस दिला आहे. हे औषध आयव्हीच्या माध्यमातून रुग्णाला दिलं जातं. या औषधावरील प्रयोग अद्याप सुरू आहेत तरीही एखाद्या रुग्णाच्या परिस्थितीला अनुसरून ते देता येतं त्याच पद्धतीने हे औषध ट्रम्प यांना देण्यात आलं आहे, अशी माहिती रिजनरॉन फार्मास्युटिकल्स या कंपनीने दिली आहे. ट्रम्प यांना दिलेलं औषध हे चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात असून, ते किती सुरक्षित आणि परिणामकारक आहे हे अद्याप सिद्ध झालेलं नाही. कोरोना विषाणूच्या बाधेनंतर होणाऱ्या गंभीर आजारावर परिणामकारकपणे उपचार करणारं एकही औषध अद्याप सापडलेलं नाही.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus, Donald Trump

    पुढील बातम्या