मराठी बातम्या /बातम्या /विदेश /ब्युटीसलून चालवायची गँगस्टरची प्रेयसी; पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक बाब उघड; आता तिचीही तुरुंगात रवानगी

ब्युटीसलून चालवायची गँगस्टरची प्रेयसी; पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक बाब उघड; आता तिचीही तुरुंगात रवानगी

कोर्टानं समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे या तरुणीला शिक्षा सुनावली.

कोर्टानं समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे या तरुणीला शिक्षा सुनावली.

कोर्टानं समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे या तरुणीला शिक्षा सुनावली.

विलासी, सुखासीन जीवनाची (Luxury Life) चटक लागली की माणूस त्यासाठी काहीही करायला तयार होतो याचेच उदाहरण म्हणजे साल्फर्डमध्ये राहणारी 30 वर्षांची समंथा कॉक्स (Samantha Cox). दिसायला अत्यंत सुंदर असलेली समन्था कॉक्स मियामी ग्लो नावाचे ब्युटीसलून (Miami Glow Beauty Saloon) चालवायची. तिचं उत्पन्न होतं वर्षाला 5 हजार डॉलर्स; पण तिचं राहणीमान मात्र डोळे दिपवणारं होतं. ती रेंज रोव्हर, पोर्शे मॅकॅन अशा गाड्या चालवताना दिसायची. तिचे कपडे, शूज, पर्सेस सगळं अतिशय उंची, डिझायनर असायचे. ती आणि तिची आई अलिशान आयुष्य जगायच्या.

अगदी चित्रपटात शोभावी तशी ही कहाणी आहे; मात्र एक दिवस पोलिसांनी समंथाला अटक केली आणि या राजेशाही आयुष्यामागचं सत्य जगासमोर आलं. समंथा आपल्या मियामी ग्लो नावाच्या ब्युटीसलूनच्या आड ड्रग्जचा व्यवसाय (Drug Dealing)करायची. तुरुंगात असलेल्या ली वॉर्थिंग्टन या आपल्या गँगस्टर प्रियकराच्या साथीनं ती हा उद्योग करत असल्याचं पोलीसांनी पुराव्यानिशी कोर्टात सिद्ध केलं आणि अखेर समंथाची रवानगी पाच वर्षांसाठी तुरुंगात झाली.

समंथाच्या घरून पोलीसांनी तब्बल 30 हजार डॉलर्स किमतीचे कपडे, शूज आणि अन्य मौल्यवान वस्तू जप्त केल्या. तिच्या आईच्या घरातूनही पोलिसांनी तब्बल 44 हजार डॉलर्स असलेली टेड बेकरची अत्यंत महाग पर्स जप्त केली. ड्रग्ज पुरवठ्याच्या आरोपाखाली दहा वर्षांची शिक्षा झालेला तिचा प्रियकर ली वॉर्थिंग्टन तुरुंगातून फोनद्वारे समंथाशी संपर्क साधून ली वॉर्थिंग्टन आपला भाऊ स्टीफन आणि अन्य दोघांच्या मदतीनं गिऱ्हाईकांना हेरोईन आणि कोकेन पुरवत असे. ग्राहकांकडून मिळणारे पैसे छोट्या छोट्या भागात विभागून वेगवेगळ्या लोकांच्या खात्यावर जमा करण्यात येत असे. तब्बल 36 खात्यांवर हा पैसा वळवण्यात आल्याचं पोलीसांनी सांगितलं. मनी लाँडरिंगचा आरोपही ली वॉर्थिंग्टननं मान्य केला आहे.

हे ही वाचा-मॉडेलला कपड्यांमुळं मिळाली अपमानास्पद वागणूक, विमानात बसण्यास केली मनाई

समंथाच्या सलूनच्या बाजूला असलेल्या गल्लीत हा व्यवहार चालत असे. पोलिसांनी समंथाच्या घरातून हेरोईनची 550 पाकिटे आणि कोकेनची 800 पाकीट तर दुसऱ्या एका घरातून 50 हजार डॉलर्स किमतीचे ड्रग्ज जप्त केल्याचं मॅचेंस्टर क्राउन कोर्टात सांगितलं. समंथानं तिचा सलूनचा व्यवसाय कायदेशीर असून त्यातून माफक उत्पन्न होत असल्याचं आणि ड्रग्ज व्यवहारासाठी तिला पैसे मिळत असल्याचं मान्य केलं. मात्र आपल्या मित्राला मदत करण्याच्या दबावाखाली ती हे काम करत असल्याचा युक्तीवाद तिच्या वकीलांनी केला; पण कोर्टानं समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे समंथाला शिक्षा सुनावली.

या व्यवसायात तिला रस्त्यावर वस्तू विक्रीचा व्यवसाय करणारी जोआना झेब्ल्युस्का, डेरेन होरोक्स, क्रिस्टोफर कॉरबेट आणि स्टीफन वॉर्थिंग्टन हे मदत करत असत, त्यांनाही अटक करण्यात आली. तिचा गँगस्टर प्रियकर ली वॉर्थिंग्टन यालाही आणखी तीन वर्षांची शिक्षा झाली. काही वर्षांसाठी या सर्वाची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

First published:

Tags: Crime news, Police