जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / लेकीला Beauty Queen पर्यंत पोहोचविणाऱ्या आईची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांकडून धक्कादायक कारण

लेकीला Beauty Queen पर्यंत पोहोचविणाऱ्या आईची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांकडून धक्कादायक कारण

लेकीला Beauty Queen पर्यंत पोहोचविणाऱ्या आईची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांकडून धक्कादायक कारण

महिलेची मुलगी रिया रैकवार हिने मिस इंडिया ताज प्रिन्सेसचा क्राऊन जिंकला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

बांदा, 11 जुलै: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बांदा जिल्ह्यातील सुधा नावाच्या महिलेने गळफास घेऊन (Suicide) आत्महत्या केली आहे. सुधा यांची मुलगी रिया रैकवार हिने मिस इंडिया ताज प्रिन्सेसचा क्राऊन जिंकला होता. (Sudha’s daughter Riya Rakwar had won the crown of Miss India Taj Princess) कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस महिलेच्या तक्रारीवर कारवाई करीत नसल्याने त्रस्त होऊन तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला एक खासगी बँक चालवत होती. बँकेत फ्रॉडची (Private bank fraud) घटना समोर आली होती. ज्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली, पोलिसांनी महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. पीडित कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, सुधा यांचा मुलगा गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. ती मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. ज्यामुळे महिला मानसिक तणावात होती आणि पोलीस ठाण्यातून घरी गेल्यानंतर खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येचं वृत्त कळताच कुटुंबाने त्यांना तातडीने रुग्णालयात पोहोचवलं. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला आणि पोलिसांवर आरोप लावले. हे ही वाचा- OYO हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आक्षेपार्ह अवस्थेत आढळले तरुण-तरुणी तपासानंतर होणार कडक कारवाई याबाबत सीओ सिटी राकेश सिंह यांनी सांगितलं की, सुधा एक खासजी बँक चालवत होत्या, ज्यात फ्रॉड झाला होता. या प्रकरणात चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं. पोलीस ठाण्यातून घरी आल्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस ठाण्या चौकशीदरम्यान महिलेने सांगितलं होतं की, तिचा मुलगा स्कॉर्पिओ गाडीने बांदाहून मौदहा येथे जाण्यासाठी निघाला होता. मात्र अद्याप तो घरी पोहोचला नाही. या प्रकरणात तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात