थायलंडः गुफेत अडकलेल्या मुलांनी असा साजरा केला वाढदिवस

थायलंडः गुफेत अडकलेल्या मुलांनी असा साजरा केला वाढदिवस

गुफेत अडकलेल्या प्रजॅक सुथम आणि पीरॅप्ट शॉम्पियोंजी या दोन मुलांचा वाढदिवसही होऊन गेला

  • Share this:

थायलंड, 09 जुलै: थायलंडच्या थाम लुआंग गुफेत 23 जूनपासून अडकलेल्या वाइल्ड बोर फुटबॉल टीममधील 12 खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांना बाहेर काढण्याचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत. रविवारी त्यातील 6 मुलांना बाहेर काढण्यात आले. यादरम्यान गुफेत अडकलेल्या प्रजॅक सुथम आणि पीरॅप्ट शॉम्पियोंजी या दोन मुलांचा वाढदिवसही होऊन गेला. प्रजॅकचा 1 जुलैला वाढदिवस होता. तर ज्यादिवशी ही मुलं गुफेत अडकली त्यादिवशीच म्हणजे 23 जूनला पीरॅप्टचा वाढदिवस होता.

1 जुलैला प्रजॅक 16 वर्षांचा झाला. प्रजॅकची मावशी, सॅलिसा प्रॉमजॅक म्हणाल्या की, 'त्याच्या वाढदिवसाची मी कोणतीही तयारी केली नव्हती. पण आता तो सुखरुप आहे कळल्यावर मी फार आनंदी आहे. देवाच्या कृपेने तो सुरक्षित आहे. मला त्याला पाहायचंय. तो भेटल्यावर मी त्याला कडकडून मिठी मारणार आहे.' प्रजॅकने त्याच्या कुटुंबियांना बाहेर वाढदिवसाची पार्टी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. प्रजॅकची आजीही आपल्या नातवाला पाहायला आतूर झाली आहे.

त्या म्हणाल्या की, 'आज मी एक गोष्ट सांगू इच्छिते की, या जगात सर्वात जास्त माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. लवकर घरी ये.' पीरॅप्टची बहिण फॅनफेस्टा शॉम्पियोंजीही भावाच्या परतण्याची आतूरतेने वाट पाहत आहे. फॅनफेस्टाने प्रजॅकला वचन दिलं होतं की, त्याच्या वाढदिवसाला ती त्याच्यासाठी खास केक बनवणार होती. ती सुखरूप घरी आल्यावर ती त्याच्यासाठी केक बनवणार आहे.

प्रजॅकप्रमाणेच इतर मुलांनीही आपल्या आई- वडिलांसाठी एक मेसेज लिहिला आहे. या मेसेजमध्ये एका मुलाने लिहिले की, 'गुफेत हवा थोडी थंड आहे. पण घाबरण्याचे काही कारण नाही. माझ्या वाढदिवसाची तयारी करा. आम्ही सगळे सुखरूप आहोत.' तर एका मुलाने आपल्या शिक्षिकेला पत्र लिहित म्हटले की, 'यादरम्यान जास्त घरचा अभ्यास देऊ नका.'

हेही वाचाः

Thailand Cave Rescue : गुहेत अडकलेल्या 6 मुलांना सुरक्षित बाहेर काढले!

महाराष्ट्राच्या 'या' भागांत हवामान खात्याने वर्तवला अतिवृष्टीचा इशारा

कुख्यात गुंड मुन्ना बजरंगीची जेलमध्येच गोळ्या घालून हत्या

 

First published: July 9, 2018, 9:34 AM IST

ताज्या बातम्या