Home /News /videsh /

कोरोनाला हरवणारी लस पोहचली दुसऱ्या टप्प्यात, 'या' देशाच्या शास्त्रज्ञांना मिळालं यश

कोरोनाला हरवणारी लस पोहचली दुसऱ्या टप्प्यात, 'या' देशाच्या शास्त्रज्ञांना मिळालं यश

आरोग्य मंत्र्यानी दिलेल्या माहितीनुसार, 2021 जुलैपर्यंत उपलब्ध होणार असून सुरुवातीला ही लस डॉक्‍टर, नर्स, पॅरामेडिक्‍स सारख्या आरोग्य विभागारीत कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी सरकारनं राज्यांकडून यादी मागवली आहे.

आरोग्य मंत्र्यानी दिलेल्या माहितीनुसार, 2021 जुलैपर्यंत उपलब्ध होणार असून सुरुवातीला ही लस डॉक्‍टर, नर्स, पॅरामेडिक्‍स सारख्या आरोग्य विभागारीत कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी सरकारनं राज्यांकडून यादी मागवली आहे.

100 पेक्षा जास्त देश कोरोना व्हायरस लसीच्या शोधात आहेत. यापैकी लसीची चाचणी अनेक देशांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि अनेक देशांमध्ये चाचणीचा अंतिम टप्पा चालू आहे.

    बॅंकॉक, 24 मे : जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. या सगळ्यात सगळे देश कोरोनाची लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जगभरातील डॉक्टर, शास्त्रज्ञ कोरोनावर लस शोधण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत आहेत. यासगळ्यात थायलंडमधून कोरोना लसीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. थायलंडमध्ये कोरोना लसीची तयारी झाली असून प्राण्यांवर याचा ट्रायल करण्यात येणार आहे. रॉयटर्सया वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, थायलंडच्या या लसीला प्रारंभिक यश मिळालं आहे आणि उंदरांवर चांगला परिणाम दिसत आहे. आता माकडांवर या लसीची चाचणी सुरू झाली आहे. थायलंडनेही असं म्हटलं आहे की सहा ते सात महिन्यांत कोरोनाची लस तयार केली जाऊ शकते. थायलंडचे उच्च शिक्षण, विज्ञान, संशोधनमंत्री सुवात मेसेन्से म्हणाले की, उंदरांवर चाचणी घेतल्यानंतर संशोधक लस तपासणीच्या पुढील टप्प्यात जात आहेत. ते म्हणाले की सप्टेंबरपर्यंत तीन डोसवर काम केलं जात असून सप्टेंबरमध्ये स्पष्ट निकाल अपेक्षित आहे. वाचा-कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रुग्णांवर मोबाईल बंदी, 'या' राज्यानं घेतला निर्णय मंत्री सुवात यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले की हा प्रकल्प मानवजातीसाठी आहे. थायलंडच्या पंतप्रधानांनी धोरण तयार केले आहे की आपण लस विकसित केली पाहिजे आणि या कार्यक्रमाद्वारे जगभरातील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी थायलंडच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं या लसीबद्दल म्हटलं होतं की उंदरांवर झालेल्या चाचणीचे निकाल अत्यंत चांगले आले आहेत. अशा परिस्थितीत, पुढील वर्षापर्यंत तेथे कोरोना विषाणूची लस तयार होईल अशी आशा आहे. वाचा-राज्य सरकारने 25 मेपासून विमानसेवा सुरू करण्याला विरोध, केंद्राला पाठवलं हे कारण प्रवक्ते तवीसिन विसानुथिन म्हणाले की, उंदरांवर लसीची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर mRNA (मेसेंजर आरएनए) लसीची चाचणी पुढील आठवड्यात माकडांमध्ये सुरू केली जाईल. ही लस थायलॅंडमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅक्सिन, मेडिकल सायन्स विभाग आणि चुलालॉंगकोर्न विद्यापीठाच्या लसी संशोधन केंद्रातर्फे विकसित केली जात आहे. एकीकडे 100 पेक्षा जास्त देश कोरोना व्हायरस लसीच्या शोधात आहेत. यापैकी लसीची चाचणी अनेक देशांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि अनेक देशांमध्ये चाचणीचा अंतिम टप्पा चालू आहे. एप्रिलमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने असा इशारा दिला होता की कोरोना विषाणूची लस बाजारात येण्यास किमान 12 महिने लागतील. वाचा-आपला जीव धोक्यात टाकून 'या' देशात रुग्णांवर उपचार करत आहेत 65 हजार भारतीय डॉक्टर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या