Home /News /news /

महाराष्ट्र सरकारने 25 मेपासून विमानसेवा सुरू करण्याला दिला नकार, केंद्राला पाठवलं हे कारण

महाराष्ट्र सरकारने 25 मेपासून विमानसेवा सुरू करण्याला दिला नकार, केंद्राला पाठवलं हे कारण

महत्वाच्या शहरांमध्ये मुंबई आणि पुणे रेड झोन आणि या शहरांमधील रहदारी आणि लोकांच्या वाहतुकीवर पूर्णपणे बंदी आहे.

    नवी दिल्ली, 24 मे : 25 मेपासून देशांतर्गत उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत, परंतु महाराष्ट्र सरकारनं यासाठी असमर्थता दाखवली आहे. 25 मेपासून विमानसेवा सुरू करू शकत नाहीत अशी महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. शनिवारी त्यांनी तसं कारणही केंद्र सरकारला दिलं आहे. महत्वाच्या शहरांमध्ये मुंबई आणि पुणे रेड झोन आणि या शहरांमधील रहदारी आणि लोकांच्या वाहतुकीवर पूर्णपणे बंदी आहे. अशा परिस्थितीत, विमानसेवा आता सुरू करू शकत नाही असं राज्यानं म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्राला असंही सांगितलं आहे की, MIAL - मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने विमानतळावर काम पुन्हा सुरू करण्यास सांगितलं, कर्मचार्‍यांची उपलब्धता, त्यांची आरोग्याची स्थिती आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी यावर विचारणा केली. पण अद्याप यावर काम पूर्ण झालं नाही. राज्य सरकारनं आपल्या उत्तरात असंही म्हटलं की, एमआयएएलने आपले कर्मचारी कंटेनमेंट झोनमधून येतील की नाही हेदेखील स्पष्ट केलं नाही. BREAKING: हिंदु धर्मगुरूच्या हत्याकांडाने नांदेड हादरलं, मठात घुसून केली निर्घृण महाराष्ट्र दररोज 27 हजार 500 प्रवासी प्रवास करतील, अशा परिस्थितीत विमानतळ व विमान कंपनीत त्यांना अधिक कर्मचार्‍यांची गरज भासणार आहे, जे एक मोठं आव्हान असेल. हे कर्मचारी विमानतळावर कसे येतील आणि ते कसे जातील कारण सार्वजनिक वाहतूक आणि टॅक्सीवर बंदी आहे. प्रवाशांचीही गैरसोय होईल असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. परंतु विमानतळावरील कामकाज सुरळीत सुरू करण्यासाठी राज्यानं शक्यतो सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. MIALकडून राज्य सरकारच्या कोर्टात चेंडू एकीकडे MIAL तयार नसल्याचं कारण राज्य सरकारने दिलं तर दुसरीकडे आम्ही विमानसेवा सुरू करण्यासाठी सज्ज असल्याचं MIAL चं म्हणणं आहे. सर्व विमानतळ ऑपरेशनसाठी तयार आहेत. जर विमानसेवा सुरू झाली तर आम्ही प्रवाश्याच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तयार केल्या आहेत. प्रवासी वाहतुकीची सुविधा ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. पैसे नाही म्हणून अंगणात पुरला भावाचा मृतदेह, शेजाऱ्यांना सांगितलं धक्कादायक कारण त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांना मात्र विमान प्रवास करण्यासाठी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने शनिवारी संध्याकाळी पाठवलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या 47190 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात 3,48,026 जणांची COVID-19 ची चाचणी करण्यात आली आहे. राज्यभरात घरी विलगीकरणात असलेले (Home Quarantine) 4 लाख 85 हजार 323 जण आहेत तर 33545 लोकांना संस्थात्मक विलगीकरणात (Institutional Quaratine) ठेवण्यात आलं आहे. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या