बँकॉक, 28 ऑक्टोबर : एका उंच इमारतीवरील पाइप किंवा दोरी कापून एखाद्याला हवेत लटकवल्याचं दृश्य आपण काही फिल्ममध्ये पाहिलं आहे. त्यावेळीच आपल्याला धडकी भरते. विचार करा, असं कुणी प्रत्यक्षात केलं तर काय होईल. शक्यतो असं कुणी कुणाच्या जीवाशी खेळणार नाही. पण एका संतप्त महिलेने हे केलं. तिने उंच इमारतीत काम करणाऱ्या कामगारांची दोरी कापली आणि त्यांना हवेतच लटकत ठेवलं (Woman cut the rope) .
राग हा खूप भारी असतो. रागात व्यक्ती कधी, कुठे, काय करेल सांगू शकत नाही. बऱ्याच लोकांना राग आल्यावर त्यांचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही, ते काय करत आहेत याचं भान त्यांना राहत नाही. थायलँडमधील (Thailand) महिलेनेही रागात असं काही केलं की त्याची चर्चा सर्वत्र आहे. या महिलेने कामगार काम करत असलेली दोरी कापून त्यांना तसंच लटकवत सोडलं.
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार 2 कामगार 32 व्या मजल्यावर इमारतीचं काम करत होते (Woman cut rope of 32nd floor). तेव्हा तिथं राहणाऱ्या महिलेने हे कामगार ज्या दोरीला लटकून काम करत होते, ती दोरीच रागात कापून टाकली. इतकंच नव्हे तर त्या कामगारांना 26 व्या मजल्यावर तिने तसंच हवेत लटकवत सोडलं.
हे वाचा - हिरोगिरी पडली भारी! बाईक स्टंटवेळी झाला भयंकर ब्लास्ट आणि...; धडकी भरवणारा VIDEO
कामगार त्या दिवशी काम करणार आहेत, याची माहिती तिला दिली नव्हती याचाच राग तिला आला आणि तिने हे धक्कादायक पाऊल उचललं. व्हिडीओत पाहू शकता दोन पेंटर्स 26 व्या मजल्यावर मदत मागताना दिसत आहेत. त्यांना खिडकी खोलून आत घ्यायला सांगत आहेत. सुदैवाने 26 व्या मजल्यावरील लोकांनी या कामगारांना वाचवलं.
पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, महिलेवर हत्येचा प्रयत्न आणि संपत्ती नष्ट केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा महिलेने आपल्यावरील आरोप फेटाळले.
हे वाचा - सौंदर्याच्या मोहात भयंकर अवस्था! 4 वर्षे अंथरूणाला खिळलाय जिवंत तरुणीचा 'मृतदेह'
पण तुटलेल्या दोरीवरील फिंगरप्रिंट आणि डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक अहवाल सादर केला. तेव्हा महिलेने कबुली दिली. पण त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं तिने नाकारलं. जर ही महिला हत्येच्या प्रयत्नात दोषी ठरली तर तिला 20 वर्षांची जेल होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Thailand, Viral, Viral videos