मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Video : Tesla कारमुळे त्रस्त व्यक्तीने स्फोटकांनी उडवली 75 लाखांची कार; काय होतं कारण?

Video : Tesla कारमुळे त्रस्त व्यक्तीने स्फोटकांनी उडवली 75 लाखांची कार; काय होतं कारण?

टेस्ला मॉडेल एसची भारतातील अंदाजे किंमत सुमारे 1.50 कोटी रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. यूएसमध्ये या कारची किंमत $ 99,490 आहे, ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये 75 लाख रुपये आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 20 डिसेंबर : इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या Tesla कारची आज जगभरात वेगळी ओळख आहे. इनोव्हेशन आणि नवीन टेक्नोलॉजीच्या बाबतीत, अमेरिकन ऑटो-टेक कंपनी टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारला जगात वेगळं स्थान आहे. मात्र अलीकडे कंपनीला सॉफ्टवेअर, ऑटोपायलट आणि ड्रायव्हर-असिस्ट सिस्टमसह अनेक त्रुटींमुळे ग्राहकांकडून टीकेला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान एका टेस्ला कार मालकाने नाराज होऊन स्वतःचीच जवळपास 75 लाखांची कार स्फोटकांनी उडवल्याची घटना समोर आली आहे.

टेस्ला मॉडेल एस कारचा मालक गाडीच्या परफॉर्मन्सने अस्वस्थ झाल्याने त्याने 50 किलो डायनामाइटने 75 लाख रुपयांची इलेक्ट्रिक सेडान कार उडवली आहे. ही घटना फिनलंडमधील आहे जिथे 2013 च्या टेस्ला मॉडेल एस (2013 Model S Sedan) वर नाखूष असलेल्या टॉमस कटाएनेनने (Tuomas Katainen) 50 किलो डायनामाइटने स्वतःची कार उडवली.

2013 मधील टेस्ला मॉडेल एसचे मालक टॉमस कटानेनने त्याच्या कारसोबत जे केलं ते मनोरंजनासाठी नव्हतं, तर ती कार आणि EV कंपनीच्या सेवेबद्दल नाराजी होती. ही इलेक्ट्रिक कार भारतात 2022 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते.

Mahindra च्या या Cars वर बंपर डिस्काउंट, 81,500 रुपयांपर्यंत मिळेल ऑफर

" isDesktop="true" id="646404" >

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रिपोर्टनुसार, टेस्ला मॉडेल एसच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये दिसणार्‍या मल्टिपल एरर कोडमध्ये दोष होता, त्यानंतर कार टेस्ला सर्व्हिस सेंटरमध्ये नेण्यात आली होती. एक महिना प्रतीक्षा केल्यानंतर, कार मालकाला टेस्लाकडून माहिती मिळाली की संपूर्ण बॅटरी पॅक बदलल्याशिवाय सेडान कारची दुरुस्ती केली जाऊ शकत नाही, ज्यासाठी त्याला 22,480 डॉलर खर्च येईल.

ही कार सुमारे आठ वर्षे जुनी होती, त्यामुळे कंपनीकडून तिच्या बॅटरीसाठी कोणतीही वॉरंटी दिली जात नव्हती. यामुळे दु:खी झालेल्या कार मालकाने 50 किलो डायनामाइट टाकून कार उडवली. कारचा स्फोट करण्यापूर्वी कार मालकाने टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांचा डमी पुतळा कारमध्ये ठेवला होता.

स्वस्तात कार खरेदीची जबरदस्त संधी, Honda Cars वर बंपर डिस्काउंट

स्फोटानंतर मालक समाधानी दिसला. तो म्हणाला की टेस्ला कारमध्ये स्फोट करणारा मी कदाचित जगातील पहिला माणूस आहे. या कृत्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु येथे चिंतेची बाब म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांचा वॉरंटी कालावधी संपल्यानंतर त्यांच्या देखभाल खर्चाबाबतची आहे.

भारतातील अंदाजे किंमत दीड कोटी

टेस्ला मॉडेल एसची भारतातील अंदाजे किंमत सुमारे 1.50 कोटी रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. यूएसमध्ये या कारची किंमत $ 99,490 आहे, ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये 75 लाख रुपये आहे.

First published:

Tags: Elon musk, Tesla electric car