नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यानंतर तालिबानच्या क्रौर्याच्या (Cruelty) एकेक कहाण्या (stories) जगासमोर यायला सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये महिला पोलीस म्हणून काम करणाऱी खातिरा (Khatira) तिच्या सहकाऱ्यांसोबत आपलं कर्तव्य निभावत होती. मात्र एका महिलेनं अशा प्रकारचं काम करणं तालिबान्यांना मान्य नव्हतं. त्यांनी खातिराचं अपहरण केलं. चाकूने तिच्यावर वार केले आणि तिचे दोन्ही डोळे फोडले.
असा केला हल्ला
खातिरा अफगाणिस्तानच्या पोलिस दलात कमांडर पदावर काम करत होती. मात्र महिलांनी अशा प्रकारचे काम करणे तालिबानला मान्य नाही. त्यामुळे तालिबानने खातिराचे अपहरण केले आणि तिच्यावर हल्ला केला. सुरुवातीला तिच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. मात्र या गोळ्या वर्मी न लागल्यामुळे खातिरा बचावली. त्यानंतर तालिबानींनी तिच्यावर चाकूने आठ वार केले. या हल्ल्यात खातिरा बेशुद्ध झाली. त्या अवस्थेत तालिबान्यांनी तिचे दोन्ही डोळे चाकूने काढून टाकले. बेशुद्ध झालेली खातिरा मरण पावली असं समजून तालिबानी तिथून निघून गेले.
काही वेळानंतर खातिरा शुद्धीत आली. तिला काहीही दिसत नव्हतं. आजूबाजूच्या नागरिकांना हाका मारून तिनं बोलावलं आणि त्यांनी खातिराला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथं तिचे डोळे काढून टाकण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर खातिराला धक्का बसला. आता पुन्हा आपल्याला कधीही काही पाहता येणार नाही, याची जाणीव तिला झाली. तिनं या प्रकाराला वाचा फोडत तालिबानवर टीका केली. त्यामुळे खातिरा अजूनही जिवंत असल्याचं तालिबानला समजलं आणि त्यांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली.
हे वाचा- तालिबानच्या कुरापती सुरुच, अफगाण नागरिकांसाठी काबूल विमानतळाचे दरवाजे बंद
भारतात आगमन
आपल्या जिवाला अफगाणिस्तानमध्ये धोका असल्याचं लक्षात आल्यावर खातिरा सहकुटुंब भारतात आली. सध्या ती दिल्लीत राहत असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तालिबानची सत्ता नसताना त्यांनी हा प्रकार केला होता. आता तर त्यांची सत्ता अफगाणिस्तानमध्ये आली आहे. त्यामुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रकार वाढणार असल्याचं खातिराचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Taliban