मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अफगाण नागरिकांसाठी काबूल विमानतळाचे दरवाजे बंद; 31 ऑगस्टपर्यंत एअरलिफ्टिंग पूर्ण करा, तालिबाननं अमेरिकेला दिला पुन्हा इशारा

अफगाण नागरिकांसाठी काबूल विमानतळाचे दरवाजे बंद; 31 ऑगस्टपर्यंत एअरलिफ्टिंग पूर्ण करा, तालिबाननं अमेरिकेला दिला पुन्हा इशारा

Kabul Airport: अफगाण नागरिकांसाठी काबूल विमानतळाचा रस्ता तालिबानांनी ब्लॉक केला.

Kabul Airport: अफगाण नागरिकांसाठी काबूल विमानतळाचा रस्ता तालिबानांनी ब्लॉक केला.

Kabul Airport: अफगाण नागरिकांसाठी काबूल विमानतळाचा रस्ता तालिबानांनी ब्लॉक केला.

  • Published by:  Pooja Vichare

काबूल, 25 ऑगस्ट: तालिबानच्या (Taliban) अफगाणिस्तानात ( Afghanistan) अजूनही कुरापती सुरुच आहेत. तालिबाननं मंगळवारी अमेरिकेला (USA) इशारा दिला की, अमेरिकेने अफगाणिस्तानातून लोकांचं एअरलिफ्ट (Airlift) ऑपरेशन 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावं. याआधीही तालिबानचे दोहास्थित प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी एका मुलाखतीत असे म्हटलं होतं की, 31 ऑगस्ट ही 'रेड लाईन' आहे आणि अमेरिकन सैन्याच्या उपस्थितीसाठी वेळ मर्यादा वाढवणे हे चिथावणीखोर कृत्य असेल.ते म्हणाले होते की मुदत वाढवण्याचा निर्णय तालिबानच्या शीर्ष नेतृत्वाला करायचा आहे.

तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिदनं मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, आमचा गट वेळेची मुदत वाढवणं याला परवानगी देणार नाही. त्यानंतर अफगाणांना विमानातून उड्डाण करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

पुढे मुजाहिद म्हणाला की, तालिबान विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अफगाणांना थांबवेल जेणेकरून तेथे गर्दी जमणार नाही. मात्र परदेशी लोकांना जाण्याची परवानगी मिळेल.

''राणेंचं वाक्य चुकलं नाही, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद'': भाजप

मुजाहिदनं सांगितलं, काबूल विमानतळाकडे (Kabul Airport) जाणारा रस्ता रोखण्यात आला आहे. परदेशी या बाजूने जाऊ शकतात. मात्र अफगाणांना परवानगी नाही. ते लोक (अफगाणी) घरी जाऊ शकतात. आम्ही आधीच सर्व काही विसरुन गेलो आहे. तालिबान तुमच्या सुरक्षेची हमी देतो.

याशिवाय, तालिबाननं अमेरिकेला कुशल अफगाण नागरिकांना येथून बाहेर काढणं बंद करावं असं सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं, या देशाला डॉक्टर, अभियंते आणि सुशिक्षित लोकांची गरज आहे. आम्हाला या कलागुणांची गरज आहे. इतकच काय तर, अफगाणिस्तान सोडून जाणाऱ्या नागरिकांना सांगितले की, परदेशात तुमचं आयुष्य धोक्यात येईल आणि परदेशी तुमची काळजी घेणार नाहीत.

अश्लील VIDEO व्हायरल होताच BJP नेत्याचा राजीनामा, नेमकं प्रकरण काय?

तालिबान्यांनी देश ताब्यात घेतल्यानंतर अनेक अफगाण नागरिक देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मुजाहिदनं सांगितलं की, देशात जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पण विमानतळावर अराजकाची समस्या कायम आहे. निर्धारित वेळेनंतर तालिबान विमानतळाची सुरक्षा स्वतःकडे घेईल. काबूलमधून व्यावसायिक उड्डाणे कधी सुरू होतील हे अद्याप स्पष्ट नाही.

First published:

Tags: Afghanistan, Kabul