काबुल, 22 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये मदत घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी ट्रकवरचा (Taliban fighters tore away national flag of Pakistan) झेंडा तालिबानी फायटर्सनी फाडून टाकला. अफगाणिस्तानमधील काबुल आणि इतर भागांना जीवनावश्यक वस्तूंचा (Pakistan supplying essentials in Afghanistan) पाकिस्तानकडून पुरवठा केला जात आहे. त्यासाठी पाकिस्तानी ट्रक अफगाणिस्तानच्या विविध भागात फिरत असल्याचं चित्र आहे. असाच एक पाकिस्तानचा झेंडा लावलेला ट्रक पाहून तालिबान्यांना संताप अनावर झाला. त्यांनी हा ट्रक रोखला आणि त्यावरील पाकिस्तानचा झेंडा उतरवून फाडून टाकला. मदत आणि हस्तक्षेप पाकिस्तानकडून अफगाणिस्तानला सध्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे या ट्रकवर पाक-अफगाणिस्तान को-ऑपरेशन फोरम असं लिहिलेलं होतं. दोन्ही देशांच्या परस्पर सहमतीनं सुरू असलेल्या या उपक्रमातील पाकिस्तानी झेंडा तालिबान्यांना सहन न झाल्याने त्यांनी तो फाडून टाकला. या ट्रक ड्रायव्हरला तालिबान्यांकडून धमकावलं गेल्याचंही या व्हिडिओत स्पष्ट दिसतं. पुन्हा ट्रकवर अशा प्रकारे पाकिस्तानी झेंडा न लावण्याची धमकी तालिबान्यांनी दिली आहे.
पाकिस्तानला वाढता विरोध पाकिस्तानकडून आर्थिक आणि इतर मदत पुरवली जात असली, तरी पाकिस्तानच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे तालिबान नाराज असल्याचं गेल्या काही दिवसांतील वक्तव्यंमधून दिसून येत आहे. आपल्या देशातलं सरकार कसं असावं, याबाबत पाकिस्तानसह कुठल्याही देशाने हस्तक्षेप करू नये, असं विधान तालिबान सरकारकडून करण्यात आलं होतं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना तालिबाननं एक प्रकारे इशाराच या विधानातून दिला होता. तालिबानमध्ये सर्वसमावशेक सरकार असावं, असं विधान इम्रान खान यांनी केलं होतं. मात्र ते तालिबानला रुचलं नसल्याचं त्यावरून स्पष्ट झालं आहे. हे वाचा - अल्पवयीन मुलाने केली आई, वडील, बहीण आणि कुत्र्यांचीही हत्या मुल्ला बरादर आणि मुल्ला युसुफ यांचा एक गट अफगाणिस्तानमधील पाकिस्तानच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे वैतागल्याची माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून मदत घेत असूनही तालिबानने त्यांचा झेंडा फाडून त्यांना हस्तक्षेप न करण्याचा इशारा दिल्याचं मानलं जात आहे.

)







