मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Shaving करू नका, ट्रिमरही वापरू नका! तालिबानच्या सर्व सलून चालकांना सूचना

Shaving करू नका, ट्रिमरही वापरू नका! तालिबानच्या सर्व सलून चालकांना सूचना

अफगाणिस्तानमधील एकाही नागरिकाची दाढी करू नका (Taliban orders saloon owners not to shave or trim beard of any Afghan citizen) आणि ट्रिमरचा वापर करून कुणाची दाढी कोरूदेखील नका, असा आदेश तालिबाननं अफगाणिस्तानातील सर्व सलून चालकांना दिला आहे.

पुढे वाचा ...

काबुल, 27 सप्टेंबर : अफगाणिस्तानमधील एकाही नागरिकाची दाढी करू नका (Taliban orders saloon owners not to shave or trim beard of any Afghan citizen) आणि ट्रिमरचा वापर करून कुणाची दाढी कोरूदेखील नका, असा आदेश तालिबाननं अफगाणिस्तानातील सर्व सलून चालकांना दिला आहे. शरिया कायद्यानुसार प्रत्येक पुरुषानं दाढी वाढवणं (Growing beard compulsory) बंधनकारक आहे. मात्र अनेक तरुण सलूनमध्ये जाऊन एक तर दाढी काढून टाकत आहेत किंवा ट्रिमरचा वापर करून त्यांना शेप देत आहेत. हे दोन्ही प्रकार चुकीचे असून त्यावर बंदी आणत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

काय आहेत आदेश?

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढत चालली आहे. शरिया कायद्यात सर्व मुस्लिम पुरुषांनी दाढी वाढवणं बंधनकारक असल्यामुळे तालिबानने नुकतीच सर्व सलून चालकांची बैठक घेतली. या बैठकीत दाढीबाबतचं धोरण निश्चित करण्यात आलं. अफगाणिस्तानातील नागरिकांनी जरी मागणी केली, तरी सलूनचालकांनी कुणाचीही दाढी कापू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. ट्रिमरचा वापर करून दाढीचा आकार कमी करणे, हेदेखील पाप असल्याचं तालिबानचं म्हणणं आहे. त्यामुळे कुणाच्याही दाढीला ट्रिमरचा स्पर्शदेखील होऊ न देण्याची ताकीद तालिबानकडून देण्यात आली आहे.

हे वाचा - रात्री मित्रासह पत्नीच्या खोलीत शिरला अन्...; 22वर्षीय विवाहितेसोबत विकृतीचा कळस

सलूनमध्ये संगीतावरही बंदी

शरिया कायद्यात संगीत ऐकणं अयोग्य असल्याचं सांगण्यात आल्याचा दाखला देत सलूनमध्ये कुठल्याही प्रकारचं संगीत वाजवणं बंद करा, असे आदेश देण्यात आले आहेत. सलूनमध्ये धार्मिक संगीत वाजवायलाही बंदी करण्यात आली आहे. या नियमांचं उल्लंघन झालं, तर कडक शिक्षा करण्याचं फर्मान तालिबाननं काढलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील सर्वसामान्य माणसांचं आयुष्य कटकटीचं झालं असून जगण्यातील रसच संपून गेल्याची भावना सामान्य व्यक्त करत आहेत. तालिबानची सत्ता आल्यापासून अफगाणिस्तानातील तरुणाई अस्वस्थ असून ही परिस्थिती कधी बदलणार, याच्या प्रतीक्षेत आहे.

First published:

Tags: Afghanistan, Taliban