• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • काबुलचं बंद विमानतळ सुरु करण्याचं काम कतारकडे, शुक्रवारपासून उडणार Domestic Flights

काबुलचं बंद विमानतळ सुरु करण्याचं काम कतारकडे, शुक्रवारपासून उडणार Domestic Flights

अमेरिकेनं (America) माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बंद असणारं काबुल विमानतळ (Kabul airport) सुरू करण्यासाठी कतारकडून (Qutar) हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

 • Share this:
  काबुल, 2 सप्टेंबर : अमेरिकेनं (America) माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बंद असणारं काबुल विमानतळ (Kabul airport) सुरू करण्यासाठी कतारकडून (Qutar) हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. विमानतळाची परिस्थिती, आव्हानं आणि भविष्यातील उड्डाणं यांचा अभ्यास करून या विमानतळाची पुनर्रचना केली जाईल आणि लवकरात लवकर विमानतळ सुरु करण्यात येईल, अशी माहिती कतारचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल् थानी यांनी दिली आहे. कतार की सौदी अरेबिया? अफगाणिस्तानमधील चार आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी तीन विमानतळांवर तालिबानने 15 ऑगस्टला ताबा मिळवला होता. मात्र काबुलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ मात्र अमेरिकेच्याच ताब्यात होतं. 31 ऑगस्टपर्यंत अमेरिकेचा या विमानतळावर ताबा होता. त्यानंतर हे विमानतळ बंद ठेवण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवण्याचा अनुभव तालिबानकडे नसल्याने ही जबाबदारी सौदी अरेबिया किंवा कतार यापैकी एका देशाकडे दिली जाईल, अशी शक्यता होती. कतारने घेतला पुढाकार या विमानतळाची जबाबदारी कुणाला दिली, याबाबत अधिकृत घोषणा तालिबानकडून करण्यात आली नसली तरी कतारने दिलेल्या विधानावरून हे काम त्या देशाला मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. हे विमानतळ कधी सुरु होईल, याची निश्चित तारीख कतारने सांगितलेली नाही. मात्र लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. शुक्रवारपासून डोमेस्टिक उड्डाणं आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरु व्हायला अवधी असला, तरी काबुलच्या विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा शुक्रवारपासून सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा तालिबानकडून करण्यात आली आहे. अफगाणिस्तानात असलेल्या सर्व विमानतळांचं कामकाज सुरु होणार असून देशांतर्गत विमानसेवा पूर्ववत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे वाचा -तालिबानकडून पाकिस्तानला मोठा झटका, काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करण्यास नकार भारताला प्रतीक्षा अफगाणिस्तानमध्ये अद्यापही काही भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्याशिवाय या नागरिकांना आणण्यासाठी विमान पाठवता येणार नसल्यामुळे या नागरिकांची प्रतीक्षा वाढली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू होताच या नागरिकांना मायदेशी परत आणणे भारत सरकारला शक्य होणार आहे.
  Published by:desk news
  First published: