मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्र राज्याचा पुन्हा लसीकरण मोहिमेत रेकॉर्ड ब्रेक, एका दिवसात 14 लाखांहून अधिक लोकांना लस

महाराष्ट्र राज्याचा पुन्हा लसीकरण मोहिमेत रेकॉर्ड ब्रेक, एका दिवसात 14 लाखांहून अधिक लोकांना लस

Maharashtra corona vaccination: कोरोनाची संभाव्य तिसरी लाट (Third Wave) रोखण्यासाठी राज्य सरकार (Maharashtra Government) सज्ज झालं आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 09 सप्टेंबर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र (Maharashtra) राज्य कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेत रेकॉर्ड ब्रेक (Record Break)करत आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट (Third Wave) रोखण्यासाठी राज्य सरकार (Maharashtra Government) सज्ज झालं असून त्यासाठी लसीकरण मोहिम अधिक वेगानं सुरु केली आहे. बुधवारी पुन्हा एकदा राज्यानं लसीकरण मोहिमेत रेकॉर्ड ब्रेक केला आहे. बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत 14 लाख 39 हजार 809 नागरिकांना लस देण्यात आली.

या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण डोसेसची संख्या 6 कोटी 55 लाखांवर गेली आहे. तर देशात सर्वाधिक 1 कोटी 79 लाख नागरिकांना लसीचा दुसरा डोस देऊन महाराष्ट्र राज्यानं देशात रेकॉर्ड केला आहे.

मोठी बातमी, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज महत्त्वाची बैठक!

राज्यात 21 ऑगस्ट रोजी एका दिवसात 11 लाख 4 हजार 465, तर 4 सप्टेंबरला 12 लाख 27 हजार 224 नागरिकांचे लसीकरण झाले. त्यानंतर आता 12 लाख लसीकरणाचा रेकॉर्ड ब्रेक करत बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत सुमारे 14 लाख 39 हजार 809 लसींचे डोस एका दिवसात देण्याची विक्रम राज्याच्या आरोग्य विभागानं करुन दाखवला आहे.

देशात महाराष्ट्र राज्य अव्वल

राज्यात आजपर्यंत एकूण 6 कोटी 55 लाख 20 हजार 560 लसींचे डोस देण्यात आलेत. त्यात सर्वाधिक 1 कोटी 79 लाख 78 हजरा 805 नागरिकांना लसीचा दुसरा डोस दिला आहे. यामुळे देशात राज्य लसीकरणाच्या मोहिमेत पहिल्या क्रमांकावर आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine