काबूल, 19 ऑगस्ट: अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यानंतर तालिबानची (Talibani) क्रूरता पुन्हा एकदा दिसू लागली आहे. काबूल (Kabul) न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानी काबूल विमानतळावर (Kabul Airport) पोहोचणाऱ्या लोकांना देश सोडू देत नाहीत. देश सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर धारदार शस्त्रांनी (Attack) वार करत आहेत. त्यांच्यावर गोळीबार (Firing) केला जातो. याच दरम्यान काबूल विमानतळावर पुन्हा एकदा गोळीबार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हा गोळीबार अमेरिकन सैनिकांकडून करण्यात आला आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी गोळीबार केला असल्याचं म्हटलं जात आहे. या गोळीबारात कोणाचा मृत्यू झाल्याचं किंवा जखमी झाल्याचं वृत्त नाही आहे.
बुधवारी तालिबानी दहशतवाद्यांनी काबूल विमानतळावर देश सोडण्याच्या उद्देशाने येणाऱ्या महिला आणि मुलांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. विमानतळावरून जमावाला परत पाठवण्यासाठी तालिबानांनी गोळीबारही केला. लॉस एंजेलिस टाइम्सचे रिपोर्टर मार्कस याम यांनी ट्विटरवर काही फोटो ट्विट केले आहेत. यावेळी तालिबानच्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
*GRAPHIC WARNING* Taliban fighters use gunfire, whips, sticks and sharp objects to maintain crowd control over thousands of Afghans who continue to wait for a way out, on airport road. At least half dozen were wounded while I was there, including a woman and her child. #Kabul pic.twitter.com/a2KzNPx07R
— Marcus Yam 文火 (@yamphoto) August 17, 2021
तालिबानचा भारताला मोठा धक्का
तालिबाननं (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर आता त्यांच्याबरोबर शेजारी किंवा इतर देशांसोबतचे संबंध देखील बदलू लागले आहेत. भारत (India) आणि अफगाणिस्तान हे जवळचे मित्र आहेत, पण तालिबान सत्तेवर येताच त्यांनी भारतासोबतचे आयात आणि निर्यात (Import-Export) दोन्ही बंद केले आहेत. तालिबाननं भारतासोबतची सर्व प्रकारची आयात आणि निर्यात रोखली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशनचे महासंचालक डॉक्टर अजय सहाई यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.
तालिबानने पाकिस्तानच्या हवाई मार्गाने होणारी कार्गो वाहतूक थांबवली आहे. देशातून होणारी आयातही रोखण्यात आली आहे. अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याने भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत आहेत. सुकामेव्याच्या मिठायांच्या किंमतीही वाढणार असल्याचं चित्र आहे.
हेही वाचा- भारतात शिकणाऱ्या अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांना सतावतेय ही चिंता
वृत्तसंस्था ANI ला डॉ. अजय सहाई यांनी सांगितलं की, तालिबानने यावेळी सर्व मालवाहतूक बंद केली आहे. आपला माल अनेकदा पाकिस्तानातून पुरवला जात होता, जो आता बंद झाला आहे. आम्ही अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, जेणेकरून आम्ही पुरवठा सुरू करू शकू. पण सध्या तालिबानने निर्यात-आयात बंद केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Kabul, Taliban