मराठी बातम्या /बातम्या /देश /भारतात शिकणाऱ्या अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका, विद्यार्थ्यांनी व्यक्त केली चिंता

भारतात शिकणाऱ्या अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका, विद्यार्थ्यांनी व्यक्त केली चिंता

Afghan Crisis: तालिबाननं अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर भारतात शिक्षण घेणाऱ्या अफगाणिस्तानच्या शेकडो विद्यार्थ्यांच्या (Student) अडचणी वाढ झाली आहे.

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट: तालिबाननं अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर भारतात शिक्षण घेणाऱ्या अफगाणिस्तानच्या शेकडो विद्यार्थ्यांच्या (Student) अडचणी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांना व्हिसापासून (Visa) स्वतःच्या जीवाची चिंता सतावत आहे. IIT दिल्लीपासून JNU पर्यंत अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. असे असूनही अफगाणिस्तानचे विद्यार्थी अजूनही चिंतेत आहेत.

जेएनयूमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांतील विषयाचं शिक्षण संपवून लवकरच अफगाणिस्तानला परतण्याचा विचार करणारा शफी सुलतान आता परत जाण्यासाठी घाबरत आहे. शफीला दुहेरी आव्हान आहे. पहिलं आव्हान म्हणजे पीजी फेलोशिप संपल्यानंतर त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल, दुसरं म्हणजे तालिबान त्यांना सतत त्रास देऊ शकतात.

तालिबानचा भारताला मोठा धक्का, घेतला हा मोठा निर्णय 

NDTV नं दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानमध्ये परत गेल्यानंतर विद्यार्थ्यांना भारतीय गुप्तेहर म्हणून त्रास देईल. आमच्या फेलोशिपची मर्यादा वाढवावी अशी आमची इच्छा आहे, असं विद्यार्थी म्हणत आहेत.

त्याच वेळी, देशातील सर्वात प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्था आयआयटी दिल्ली देखील आपल्या अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांसाठी चिंतित आहे. येथे 16 विद्यार्थी आहेत. मात्र 15 विद्यार्थी अफगाणिस्तानमध्येच आहेत. आता आयआयटीमध्ये प्रवेश घेतलेल्या आणि अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत देण्यासाठी एक हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आला आहे.

First published:

Tags: Afghanistan, India, Student, Students